27 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरराजकारण३२ जणांचा जीव जाऊनही महानगरपालिका २ वर्षांपासून सुस्त

३२ जणांचा जीव जाऊनही महानगरपालिका २ वर्षांपासून सुस्त

Google News Follow

Related

रहिवाशांचा महापालिकेविरुद्ध आक्रोश

दोन वर्षांपूर्वी मालाडमध्ये दरड कोसळून ३२ जणांचा मृत्यू झाला होता. पण तरीही आजपर्यंत महानगरपालिकेने कोणतीही संरक्षक भिंत बांधलेली नाही. आश्चार्याची गोष्ट म्हणजे आजही त्याच जागी ७५ कुटुंब रहात आहेत. महानगर पालिकेच्या या असंवेदनशील आणि संथ कारभारावर जनता संतप्त आहे. विरोधकांकडूनही हेच का मुंबई मॉडेल? असा सवाल केला जात आहे.

“आम्ही मृत्यूच्या दाढेत रहात आहोत. दरवेळी पाऊस पडला की आम्हाला भीती वाटते. कारण इथे भूस्खलनाला सुरवात होते. ४०-४० किलोचे मोठे दगडसुद्धा खाली येतात.” अशी माहिती आझाद नगरच्या वस्तीत राहणाऱ्या तेजप्रताप त्रिपाठी यांनी दिली. “केवळ ज्या ८६ कुटुंबांमधून कोणी दगावलं होतं त्यांचंच पुनर्वसन केलं गेलं. दोन वर्षांपूर्वी झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेने कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत.महानगरपालिकेने उर्वरित ७५ कुटुंबांनाही स्थलांतरित करण्याची व्यवस्था केली पाहिजे.” असंही ते म्हणाले.

२ जुलै २०१९ रोजी पिंपरी पाडा आणि आंबेडकर नगर जवळ अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर दरड कोसळली होती. अतिवृष्टीमुळे ही घटना घडली. यामध्ये भरपूर पाऊस पडल्यामुळे ३००० झोपड्या वाहून गेल्या. यामध्ये ३२ लोकांना जीव गमवावा लागला. ज्यामध्ये १० मुलांचाही समावेश होता. “आम्ही इथे रात्री झोपू शकत नाही, आम्हाला पाऊस पडताना खाली ओझर येताना जाणवतात. आम्ही इथून दुसरीकडे जायला तयार आहोत पण पालिकेने आमच्या राहण्याची व्यवस्था करावी.” असं किरण गुप्ता नावाच्या अजून एका रहिवाशांनी सांगितलं.

हे ही वाचा:

मुलगा केंद्रीय मंत्री; पण आईवडील शेतात समाधानी

अश्लिल चित्रपटनिर्मितीप्रकरणी राज कुंद्रा अटकेत

केरळमध्ये ईद साजरी करताना कोरोनाचा धोका नाही

लखनौ विद्यापीठात विद्यार्थी गिरवणार सावरकरांच्या विचारांचे धडे

“दोन वर्ष होऊनही काहीच झालेलं नाही. इथल्या रहिवाशांना दुसरीकडे हलवलं पाहिजे आणि तुटलेली भिंत पुन्हा बांधून दिली पाहिजे.” असं भाजपाचे नगरसेवक विनोद शर्मा यांनी सांगितलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा