25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरराजकारणसाथीच्या रोगासाठी ठेवलेला पालिकेचा निधी आधीच संपला!

साथीच्या रोगासाठी ठेवलेला पालिकेचा निधी आधीच संपला!

Google News Follow

Related

शहरातील कोविड प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी महापालिकेने गेल्या नऊ महिन्यांत जवळपास तेराशे कोटी रुपये खर्च केले आहेत. या वर्षाच्या साथीच्या रोगासाठी राखून ठेवलेला सर्व निधी आधीच संपला आहे. त्यामुळे बीएमसी प्रशासनाने मार्चपर्यंत अतिरिक्त ३०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद न करता प्रचंड खर्च करण्यात आला आहे.

फेब्रुवारी २०२१ मधील आपल्या बजेटमध्ये, पालिकेने तरतूद केली होती कोविडसाठी सुमारे एक हजार ३८० कोटी रुपये आणि त्यापैकी एक हजार ३०३ कोटी रुपये नोव्हेंबर पर्यंत वापरले गेले आहेत. महापालिका आता कोविड बिले भरण्यासाठी आपल्या आकस्मित निधीतून ३०० कोटी रुपये वळवणार आहे. नागरी संस्थेने कोविड -19 महामारीचा सामना करण्यासाठी दिलेल्या आकस्मित निधीतून सुमारे ४०० कोटी रुपये आधीच वापर वापरले आहेत.

पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोविडसाठी अधिक निधीची आवश्यकता असू शकते. आणि त्यामुळे आकस्मित निधीतून पैसे वळवले जातील. बीएमसीने कोविडसाठी ३०० कोटी रुपये वळवण्याचा प्रस्ताव नागरी स्थायी समितीसमोर ठेवला आहे.

विरोधी पक्षांच्या म्हणण्यानुसार, बीएमसी ने आतापर्यंत तीन हजार कोटी रुपये महामारीशी लढण्यासाठी खर्च केले आहेत. बीएमसीच्या अनेक खरेदीवर भ्रष्टाचार आणि अनियमिततेचे आरोप झाले आहेत. म्हणून कोविड -19 वर बीएमसीच्या खर्चावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी भाजपने केली आहे.

भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा म्हणाले की, ” अनेक पत्रे लिहून आणि प्रश्न विचारूनही, पालिका कराराचा तपशील सादर करण्यात अयशस्वी ठरली आहे. जवळजवळ प्रत्येक खरेदीमध्ये हेराफेरी केली गेली आहे आणि साथीच्या आजाराच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैशांची उधळपट्टी झाली आहे. बहुतांश कंत्राटे फ्लोटिंग टेंडर्सशिवाय देण्यात आली. अशाप्रकारे बांधकाम व्यावसायिकांनी जम्बो सेंटर बांधण्याचे कंत्राट मिळवले. पालिकेने मार्च २०२० ते मार्च २०२२ पर्यंतच्या सर्व कोविड खर्चावर श्वेतपत्रिका सादर केली पाहिजे.”

हे ही वाचा:

कोरोना संसर्ग झालेल्या दोन कोटी लोकांना पेटीत केले बंद

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षपदी राणे समर्थक मनीष दळवी

१८ जानेवारीला पृथ्वीजवळून जाणार भलामोठा लघु्ग्रह!

वर्ध्यात गोबर गॅस टाकीत सापडल्या कवड्या, हाडे; अवैध गर्भपाताचे रॅकेट?

 

पालिकेच्या कोविड खर्चाचा मोठा भाग म्हणजे जंबो सेंटर्सची देखभाल आणि या केंद्रांच्या भाड्यावर जातो. बीएमसीला त्याच्या नवीन जंबो कोविड-19 केंद्रांच्या आउटसोर्स ऑपरेशन्ससाठी १०४ कोटी रुपये खर्च करायचे होते. मालाड येथे तीन नवीन जम्बो सेंटर सुरू करण्याची योजना होती. सायन आणि कांजूरमार्गसह बीकेसी आणि दहिसरमधील काही भाग खाजगी एजन्सींना दिले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा