23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणसव्वाशे कोटी झाला खर्च, पण पालिकेचा सायकल ट्रॅक अर्धवट

सव्वाशे कोटी झाला खर्च, पण पालिकेचा सायकल ट्रॅक अर्धवट

Google News Follow

Related

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा जलवाहिनीच्या दोन्ही बाजुला सुमारे ३९ किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक विकसित करण्याची ४८८ कोटी रुपयांची योजना आखण्यात आली होती. मुंबई महापालिकेने ही योजना आखली आणि आतापर्यंत सुमारे १२५ कोटी रुपयांचा खर्च केला.

मनपाने २०१८ मध्ये प्रकल्प सुरू केला आणि मार्च २०२१ पर्यंत तो पूर्ण होणे अपेक्षित होते. पण मुंबई महापालिकेचा सायकल ट्रॅक प्रकल्प फेब्रुवारी २०२२ संपत आला तरी अपूर्णच आहे. आता हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी कालावधी लागेल आणि दिरंगाई झाल्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबईत ३९ किमी लांबीची तानसा जलवाहिनी आहे. या जलवाहिनीचा एक भाग मुलुंड ते धारावी आणि दुसरा भाग घाटकोपर ते शीव असा आहे. या जलवाहिनीच्या दोन्ही बाजूला १० मीटर अंतरापर्यंत असणारी अतिक्रमणे हटवून जलवाहिनी सुरक्षित करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने पालिकेला देऊन काही वर्षे झाली.

जलवाहिनी भोवतालचा परिसर महापालिकेच्या नऊ विभागांशी संबंधित आहे. या विभागांनी अतिक्रमणे हटवून जागा मोकळी करण्याचे काम सुरू केले. पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून मोकळ्या केलेल्या जागेच्या रक्षणासाठी एक संरक्षक भिंत बांधण्याचाही निर्णय झाला.

हे ही वाचा:

बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची कर्नाटकमध्ये हत्या

काश्मीर पंडितांच्या नरसंहाराची कथा मांडणाऱ्या ‘काश्मीर फाईल्स’ चे ट्रेलर प्रदर्शित

नाशिक महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकवा

झारखंड सरकारचे उर्दू प्रेम उफाळले; भोजपुरी, माघी भाषा वगळल्या

मोकळ्या जागेचा वापर जनहितासाठी करण्याच्या हेतूने सायकल ट्रॅक तसेच सुशोभीकरणासाठी जलतीरी असा ४८८ कोटींचा प्रकल्प आखण्यात आला तेव्हापासून या प्रकल्पावर १२५ कोटींचा खर्च झाला आहे. पण मुदत संपली तरी प्रकल्प अपूर्ण आहे. काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या बजेटमध्ये याच प्रकल्पासाठी ४५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एकूण नियोजन बघता प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी काही वर्षे लागण्याची शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा