पेंग्विन गँगची माघार

पेंग्विन गँगची माघार

आक्रमक विरोधकांसमोर शिवसेना शासित मुंबई महापालिका अखेर झुकली आहे. पेंग्विन देखभालीसाठी खढण्यात आलेले टेंडर अखेर महापालिकेने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकर जनतेचा दबाव आणि भाजपाने घेतलेली आक्रमक भूमिका यामुले महापालिकेला नमते घेणे भाग पडल्याचे म्हटले जात आहे.

मुंबई महापालिकेवर गेल्या काही दिवसांपासून टीकेचा भडिमार होताना दिसत होता. राणीच्या बागेतील पेंग्विन्सच्या देखभालीसाठी काढण्यात आलेल्या १५ कोटींच्या टेंडर मुळे मुंबई महापालिका चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. या टेंडरवरून मुंबई भाजपाने महापालिकेला चांगलेच धारेवर धरले होते. तर राज्यात शिवसेने सोबत सत्तेत भागीदार असणाऱ्या काँग्रेस पक्षानेही या टेंडरचा विरोध केला होता.

हे ही वाचा:

सार्वजनिक गणेशोत्सव आगमन-विसर्जनात १० जण नाचणार

शिवडी बीडीडी चाळ रहिवासी वाट पाहात आहेत!

चोरट्यांकडे एक गाडी, आठ लॅपटॉप

विद्यार्थिनींना मिळणार एनडीएमध्ये प्रवेश

एवढी टीका होऊनही महापालिका आपल्या या कृतीचे समर्थन करताना दिसत होती. राणीच्या बागेत पेंग्विन्स आल्यापासून राणीच्या बागेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे असा दावा महापालिकेने केला होता. तर त्यामुळे मिळणारे उत्पन्नही वाढले आहे असे मुंबई महापालिकेचे म्हणणे होते. पेंग्विन्समुळे राणीच्या बागेचे उत्पन्न १२.२६ कोटींनी वाढल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात येत होते.

पण तरी देखील विरोधक काही शांत होताना दिसत नव्हते. तर आधीच मुंबई महापालिकेच्या विरोधात तयार झालेले जन्मात या निर्णयामुळे अधिक तीव्र होताना दिसत होते. अखेर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जनतेचा आक्रोश परवडनारा नाही हे बहुदा सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आले असावे. म्हणूनच हे १५ कोटींचे टेंडर मागे घेण्यात आले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version