साऱ्या देशाचे डोळे लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विजयी होणार असून भाजपचा महापौर बसेल असा विश्वास राजहंस सिंह यांनी व्यक्त केला आहे. विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. राजहंस सिंह ही मुंबई येथून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. त्यांच्य विरोधात इतर कोणताही उमेदवार उभा नसल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली आहे.
राजहंस सिंह यांना भारतीय जनता पार्टी तर्फे विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली होती. मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांच्या मतदानातून दोन आमदार विधान परिषदेवर निवडून जातात. सध्या मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या बघता भारतीय जनता पार्टीचा एक आमदार निवडून जाणे निश्चित होते. त्यानुसार राजहंस सिंह हे बिनविरोध निवडून गेले आहेत.
हे ही वाचा:
चाळीसगावचे वर्दीतले चोर! बघा आमदारांनी केलेले Sting Operation
भाजप पदाधिकारी अमोल इघे यांची हत्या
शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील दोषींना आता फाशीऐवजी जन्मठेप
मी बॉस नंबर १ आहे का हे माहीत नाही! परमबीर यांनी चौकशीत केले स्पष्ट
या विजयानंतर माध्यमांशी संवाद साधताना पक्ष नेतृत्वाचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमीत शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील, मंगल प्रभात लोढा या सर्वांनाच त्यांनी धन्यवाद म्हटले. तर आगामी मुंबईत महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाचाच महापौर बसणार असा विश्वास राजहंस सिंह यांनी व्यक्त केला आहे.
राजहंस सिंह हे भाजपाचा उत्तर भारतीय चेहरा म्हणून पुढे येत आहेत. मुंबई महापालिका निवडणूकीत उत्तर भारतीय मतदार महत्वाचे ठरणार आहेत. त्या दृष्टीने राजहंस सिंह यांना देण्यात आलेली आमदारकी महत्त्वाची मानली जात आहे.