मुंबई महापालिकेने कोरोना रुग्णालये आणि कोरोना उपचार केंद्रासाठी १२०० आक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. परंतु इथेही पालिकेने छुपेपणाने का होईना घोटाळा करण्याचे सोडले नाही.
महापालिका चिनी बनावटीच्या प्रत्येकी एका कॉन्सन्ट्रेटरसाठी ७९ हजार रुपये मोजण्यात येणार असून, बाजारभावापेक्षा प्रत्येकी तब्बल १५ ते २० हजार रुपये अधिक दराने ही खरेदी होणार आहे. पालिकेने स्वतःच्याच माथी अधिक रकमेची खरेदी करण्यास सुरुवात केलेली आहे. मुख्य म्हणजे शुक्रवारी या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी सुद्धा दिली.
कोरोनाच्या आत्ताच्या लाटेत वाढती रुग्णसंख्या पाहता, तुलनेत ऑक्सिजन कमी पडत असल्याने पालिकेने प्रतिमिनिट दहा लिटर क्षमतेचे १,२०० कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या खरेदीसाठी श्रद्धा डिस्ट्रिब्युटर कंपनीची निवड केलेली आहे. अवघ्या काही महिन्यांवर महापालिकेची निवडणूक असताना, पालिकेच्या एकूणच कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताहेत. एकीकडे शहरातील १६ ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची पालिकेची योजना रामभरोसे आहे. दुसरीकडे स्वतःच्याच माथी अधिक किंमतीचे कॉन्सन्ट्रेटर खरेदी करून पालिकेचा गैरव्यवहार आता चव्हाट्यावर आलेला आहे.
हे ही वाचा:
अखेर जालन्यातील ‘त्या’ पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन
पश्चिम बंगालच्या मदतीसाठी धावलेल्या पंतप्रधानांचा ममता दीदींकडून अपमान
बॉलीवूडला पडली वीर सावरकरांची भुरळ, लवकरच येणार बायोपिक
७९ हजार रुपये एक नगाप्रमाणे १,२०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसाठी कंत्राटदाराकडून १० कोटी ४२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. चिनी बनावटीचे हे कॉन्सन्ट्रेटर आहेत. तसेच १० लिटर क्षमतेच्या कॉन्सन्ट्रेटरचा बाजारभाव हा ५० ते ६० हजार रुपये असून, पालिकेने हे कॉन्सन्ट्रेटर चढ्या दराने खरेदी केले आहेत. असा दावा विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.
दोन वर्षांपूर्वी चिनी बनावटीचे कॉन्सन्ट्रेटर ३० ते ४५ हजारांपर्यंत मिळत होते. परंतु चीनी बनावटीचे कॉन्सन्ट्रेटर पालिका घेत आहे, त्यामुळे स्वतःची लूट करून घेत आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात ३०० कॉन्सन्ट्रेटरचा पुरवठा २६ मेपर्यंत केला जाणार असल्याचे वितरकाने पालिकेला कळवले होते. पण मूळात हा प्रस्ताव २८ मे रोजी मंजूर झाल्याने पुरवठा कधी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उर्वरित कॉन्सन्ट्रेटर गरजेप्रमाणे मागवले जाणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे.