25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरअर्थजगतबीएमसीचा अर्थसंकल्प थोड्याच वेळात... मुंबईकरांसाठी काय असेल ?

बीएमसीचा अर्थसंकल्प थोड्याच वेळात… मुंबईकरांसाठी काय असेल ?

Google News Follow

Related

मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प काहीच वेळात सादर होणार आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त आय.एस.चहल प्रशासक या नात्याने २०२३-२४ वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पात मुंबईकरांना काय मिळणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.

ईडी आणि कॅगच्या चौकशीला सामोरे जाणारे आयुक्त चहल यंदा अर्थ संकल्पात नव्या करासाठी तरतूद करण्याची शक्यता नाही असे म्हटल्या जात आहे.गेल्या अर्थसंकल्पात मुदत ठेवी मोडून विकासकामांवर पैसा खर्च करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेकडे सध्या सुमारे १ लाख कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबईच्या सुशोभिकरणासाठी चहल फिक्स डिपॉझिट मोडणार का अशी चर्चा आहे.

 सुशोभिकरण, प्रदूषण, पर्यावरण, पूल, आधुनिक रुग्णालय, रस्ते, एसटीपी प्रकल्प, मियावाकी वन योजना, उद्यान आणि पर्यटन स्थळांचा विकास यावर अर्थसंकल्पात भर देणे अपेक्षित आहे. आगामी निवडणुका पाहता मुंबईकरांना आकृष्ट करण्यासाठी या अर्थसंकल्पात काही कर सवलती मिळतील अशी अपेक्षा आहे.

आशियातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प देशातील ८ राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षा मोठा आहे. या राज्यांमध्ये त्रिपुरा, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपुर, सिक्किम आणि गोवा या राज्यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

करमाफीनंतर का उडाला गोंधळ?

प्रभादेवीत दारूड्यांची जत्रा

मुंबईला दहशतवादी हल्ल्याची धमकी दिव्यांग,

अनाथ युवकांसाठी दीपस्तंभ मनोबल देशातील आदर्श प्रकल्प 

अर्थसंकल्पीय तरतुदीत वाढ

२०२१-२२ मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प ३९०३८.८३  कोटी रुपयांचा होता. २०२२-२३मध्ये त्यात १७.७० % वाढ करून तो ४५९४९.२१  कोटी रुपये करण्यात आला.  यावेळीही अर्थसंकल्पात ५० हजार कोटींपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पायाभूत प्रकल्पांचा विकास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदीर्घ काळ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्याची छाप मुंबईच्या पायाभूत प्रकल्पावर स्पष्टपणे दिसून येत आहे. महापालिकेचे अनेक प्रकल्प एकतर अपूर्ण आहेत किंवा वर्षानुवर्षे रखडलेले आहेत. अर्थसंकल्पात असे प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जाऊ शकतो असे जाणकारांचे आहे.

अर्थसंकल्पात या प्रकल्पांवर असू शकतो भर जलबोगदा, महालक्ष्मी ते महिम, वांद्रे  सायकल ट्रॅक,  प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईत इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन ,रस्त्यावर पार्किंगच्या ठिकाणी, सार्वजानिक पार्किंगच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन ,जुन्या पुलांची देखभाल, दुरुस्ती,वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी व्यवस्था

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा