महापालिकेचे खासगीकरण होतेय का?

महापालिकेचे खासगीकरण होतेय का?

महापालिकेचा एकूणच कारभार हा गूढ आहे. टक्केवारीच्या नादापायी पालिका कसा कारभार करेल हे सांगता येत नाही. एकूणच मुंबई महापालिकेचा अनागोंदी कारभाराचे नमुने रोजच आपल्यासमोर येत असतात. आता नव्याने महापालिका मलनिःसारण करण्यासाठी तब्बल १ कोटी ६६ लाखांचा चुराडा करणार आहे.

पालिकेचा बहुतांश कारभार आता खासगीकरणाच्या माध्यमातून पार पडतो. मग या खासगीकरणामध्ये टक्केवारीची गणिते जिथे जुळतात, त्यांना काम मिळते. खासगीकरणाची गती पालिकेमध्ये वाढत असून, या खासगीकरणाला कुणाचीही ना नाही.

हे ही वाचा:

रस्ते अपघातांचे प्रमाण २०२४ पर्यंत ५० टक्क्यांवर आणणार

मनसुखच्या डायटम रिपोर्टमुळे नवा संशय

गांजा विकायला तरुणीने सोडली इंजिनिअरिंगची नोकरी

‘शिकाऊ’ लायसन्ससाठी दलालांची चांदी

सध्याच्या घडीला पालिकेच्या माध्यमातून बहुतेक विभागांनी सफाईची कामे ही खासगी माध्यमातूनच होत आहेत. यामध्ये रुग्णालये, शाळा तसेच प्रमुख रस्त्यांचाही समावेश होतो. त्यामुळे पालिकेला खासगीकरणाची ओढ ही काही आता लागलेली नाही.

इतकेच नव्हे तर मालमत्ता सुरक्षा सुद्धा आता खासगी सुरक्षारक्षकांच्या हातात सोपवण्यात आलेली आहे. त्यामुळे महापालिका कुठल्या विभागावर खर्च करायचा आणि तिथून कशी टक्केवारीची गणिते जुळवून आणायची याचाच विचार करताना दिसते. मलःनिसारण विभागातील कचरा व कामगारांना ने आण करण्यासाठी वाहने हे सध्या महापालिकेच्या रडावर आहे. त्यामुळेच आता मलःनिसारण विभागासाठी तब्बल १ कोटीपेक्षा जास्त आता खर्च करण्यात येणार आहे. खासगीकरणाचे हे वारे महापालिकेतील अनेकांचे खिसेसुद्धा गरम करते.

Exit mobile version