25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरराजकारण'अविघ्न पार्क' अग्नितांडवानंतर पालिकेला जाग; अग्निशमन यंत्रणेचा घेणार आढावा

‘अविघ्न पार्क’ अग्नितांडवानंतर पालिकेला जाग; अग्निशमन यंत्रणेचा घेणार आढावा

Google News Follow

Related

मुंबईतील करी रोड रेल्वे स्थानकाजवळील अविघ्न पार्क इमारतीला काल (२२ ऑक्टोबर) भीषण आग लागली होती. काल घडलेल्या या भीषण घटनेनंतर मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. कालच्या घटनेत एका व्यक्तीला जीव गमवावा लागला होता. अग्निसुरक्षा यंत्रणा बहुमजली इमारतींमध्ये कार्यरत आहे की नाही याचा शोध आता महापालिका घेणार आहे. करी रोड परिसरातील अविघ्न पार्क इमारतीच्या १९व्या मजल्यावर लागलेल्या आगीच्या घटनेमुळे मुंबईतील बहुमजली इमारती पालिकेच्या आता रडारवर आल्या आहेत.

मुंबईतील बहुमजली इमारतींच्या पुन्हा अग्निप्रतिबंधक यंत्रणेची कसून तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अग्निप्रतिबंधक यंत्रणेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या सोसायट्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई पालिकेकडून करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

…तर ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी करणार आंदोलन

१०० कोटी लसीकरण हे नव्या भारताचे चित्र

काँग्रेसच्या सभेबाहेर शेतकरी सांगतात आमचे मत भाजपालाच

करी रोडमधील अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग

‘महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीवरक्षक उपाययोजना कायदा २००६’ अन्वये बहुमजली इमारतीत अग्निप्रतिबंधक यंत्रणा उभारणे बंधनकारक आहे. त्यामुळे ही यंत्रणा न उभारणाऱ्या सोसायटय़ांविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार खटला दाखल करण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे. लवकरच मुंबईतील बहुमजली इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणेचा आढावा घेऊन निष्काळजी सोसायटय़ांची यादी तयार करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अविघ्न इमारतीला लागलेल्या आगीला दोषी असणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. घटनास्थळी काहीच मिनिटांमध्ये महापालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले होते. आग विझवण्यावर आणि रहिवाशांच्या सुटकेवर जास्तीत जास्त भर दिला गेला. याप्रकरणी जो कुणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करणार असून अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणारच, कुणालाही अभय नाही. आगीची संपूर्ण चौकशी केली जाईल, चौकशीनंतर दोषींवर कारवाई करु, असे आश्वासन पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा