महानगरपालिकेत आता २२७ ऐवजी २३६ वॉर्ड

महानगरपालिकेत आता २२७ ऐवजी २३६ वॉर्ड

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महत्वाची आणि वादग्रस्त माहिती समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेतील ९ प्रभाग वाढण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेत २२७ ऐवजी २३६ नगरसेवक असणार आहेत. यापूर्वीच भाजपातर्फे एका शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेट देऊन शिवसेनेच्या सोयीसाठी होणारा हा बदल बेकायदेशीर असल्यामुळे त्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

याविषयी भाजपा आमदार अमित साटम यांनी माहिती दिली होती. “बृहन्मुंबई महानगर पालिकेने जो लँड बाउंड्रीचा मसुदा तयार केलेला आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप आणि घोळ झाल्याचं समोर आलं आहे. निवडणूक विभागाने तयार केलेला मसुदा मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांना दिला. सुमारे २३ आणि २४ तारखेला हा मसुदा दिल्यानंतर चहल यांनी शिवसेनेने बाहेरून नियुक्त केलेल्या एका एजन्सीने तयार केलेला एक सुधारित मसुदा दबाव टाकून अधिकाऱ्यांकडून मंजूर करवून घेतला. २६ तारखेला तो मसुदा राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात आला. या मसुद्यात, बेकायदेशीरपणे जनगणनेच्या माहितीतून मोठ्या प्रमाणावर पश्चिम उपनगरात फेरफार केलेला आहे. शहरात केला नाही, पूर्व उपनगरात केला नाही परंतु पश्चिम उपनगरमध्ये केला.” असं भाजपा आमदार अमित साटम यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं.

हे ही वाचा:

२६ नोव्हेंबरपासून पुन्हा दिल्लीत ट्रॅक्टर रॅली?

अनियंत्रित परदेशी देणग्यांचा वापर राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये

रियाझ भाटी म्हणतो, मी राष्ट्रवादीचाच

३४% जागांवर भाजपाचा बिनविरोध विजय

“त्यामुळे राज्य निवडणूक आयुक्त युपीएस. मदान यांची भाजपाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक कोणत्याही प्रकारच्या दबावाशिवाय, प्रामाणिकपणे पार पडावी अशी मागणी आज आम्ही केली. त्याचबरोबर हा बेकायदेशीर मसुदा जर राज्य निवडणूक आयोगाने स्वीकारला तर भाजपाचे सर्व आमदार हे हंगर स्ट्राईकवर त्यांच्या कार्यालयामध्ये बसतील आणि मोठ्या प्रमाणावर जनतेचं आंदोलन हे शिवसेनेच्या धोरणाविरुद्ध मुंबईत उभं केलं जाईल असंही आम्ही त्यांना सांगितलं. आमचा असा सवाल आहे की, मुंबई महानगर पालिकेची सत्ता आपल्या हातून जाईल म्हणून शिवसेनेकडून जाणीवपूर्वक असे बदल वॉर्डांमधे केले जात आहेत का? असं असेल तर आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो.” असंही ते म्हणाले.

Exit mobile version