शाळांसाठी पालिकेने घेतला ‘टॅब’डतोब निर्णय

शाळांसाठी पालिकेने घेतला ‘टॅब’डतोब निर्णय

एकीकडे मुंबई महापालिका पालिकेवर अर्थसंकट आलेले आहे असा दावा करत आहे. दुसरीकडे मात्र काही ठराविक विभागांमध्ये पालिकेकडून विकासमकामेही सुरू आहेत. तर आता एक नवीनच घाट बीएमसीने घातलेला आहे. शाळा गेली दीड वर्षे बंद आहेत, तरी महापालिकेतील शाळांसाठी आता पालिकेने चक्क टॅब घेण्याचा घाट घातलेला आहे. सध्याच्या घडीला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये निविदा माध्यमातून टॅब खरेदी होणार आहे. या टॅबची किंमत ही १० हजारांपेक्षा अधिक असल्याचे आता स्पष्ट होत आहे.

टॅबसाठी आता पालिकेने निवदांसाठी कंबर कसलेली आहे. तब्बल ४० कोटींची खरेदी आता महापालिका करणार आहे. यातील मेख म्हणजे कोरोना कार्यकाळात अनेक मुलांचे टॅब बंद पडले होते. त्यावेळी मात्र पालिकेने दुर्लक्ष केले होते. आता मात्र टॅब खरेदीचाच घाट पालिकेने घातल्यामुळे शिक्षकांनाही प्रश्न पडलेला आहे. मुख्य म्हणज कोरोनाकाळातच अनेक विद्यार्थ्यांचे टॅब बंद पडले होते. त्याकडे मात्र दुर्लक्ष केले गेले, मग आता हा टॅब घेण्याचा का घाट घातला जातोय म्हणूनच आता शिक्षकही संतप्त झालेले आहेत. ज्यावेळी टॅबची गरज होती, त्यावेळी टॅब बंद होते. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासूनच वंचित राहिले असे आता शिक्षक बोलत आहेत.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांना वॉरंट बजावणार का?

होल ‘हिंग’ इज दॅट की भैय्या…

‘रेशमाच्या रेघांनी’वर थिरकले राष्ट्रवादीचे गॅसदरवाढीचे आंदोलन

‘हरवलेल्या’ पतीचा खून झाल्याचे अखेर झाले उघड

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शिक्षण घेता यावे याकरता टॅब संकल्पना आणली होती. परंतु टॅब अचानाक बंद पडणे किंवा काही ठराविक वैशिष्ट्यांचा समावेश नसणे असे तांत्रिक अडथळे सुरु होते. ही अडथळ्यांची शर्यत पार पाडतच महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण व्हायचे.

मुख्य म्हणजे निकृष्ट दर्जाचे हे टॅब महापालिकेने खरेदी केले होते. त्यामुळे ते मध्येच बंदही पडायचे. या एकूणच कारभारावर वेळोवेळी टिकाही झालेली होती. टॅबच्या किमतीवरूनही चांगलेच राजकारण तापले होते.

Exit mobile version