कंभोज यांच्या घराकडे आता पालिकेची वक्रदृष्टी

कंभोज यांच्या घराकडे आता पालिकेची वक्रदृष्टी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ‘अधीश’ या बंगल्याला दुसऱ्यांदा नोटीस पाठवल्यानंतर आता सूडबुद्धीने भाजपाचे नेते मोहित कंभोज यांना लक्ष्य करण्यात आले आहे. शिवसेनेवर टीका करणारे भाजपाचे नेते मोहित कंभोज यांनाही आता नोटीस पाठवण्यात आली आहे.

मोहित कंभोज यांच्या घरात अनधिकृत काम करण्याबाबत मुंबई महापालिकेने त्यांना नोटीस पाठवली आहे. मोहित कंभोज यांनी या संदर्भातील माहिती ट्विट करुन दिली आहे. गेल्या काही काळापासून मोहित कंभोज हे सातत्याने शिवसेनेवर आणि ठाकरे सरकारवर निशाणा साधत आहेत. क्रूझ ड्रग्ज प्रकरण, आर्यन खान अटक प्रकरण, नवाब मलिक आरोप प्रकरण, भाजपा आमदार नितेश राणे यांना अटक प्रकरण या सर्व प्रकरणात मोहिम कंभोज हे सातत्याने शिवसेना नेते आणि सरकारवर टीका करीत आहेत. त्यामुळे सूडबुद्धीनेच ही नोटीस त्यांना पाठवण्यात आल्याचे मोहित कंभोज यांचे म्हणणे आहे.

“कोणत्याही खोट्या प्रकरणात अडकवता आलं नाही म्हणून घरावर मुंबई पालिकेची नोटीस पाठवली. कंगना रनौत आणि नारायण राणे यांचं काहीही करू शकले नाहीत म्हणून त्यांची पण घरं तोडा. पण हरकत नाही. हे पण ठीक. काहीही करा तुम्ही पण महाविकास आघाडी सरकारच्या पुढे झुकणार नाही,” असे ट्विट मोहित कंभोज यांनी केलं आहे.

हे ही वाचा:

‘त्या’ धावणाऱ्या मुलावर झाले आनंद महिंद्र फिदा

भाजपाला मतदान केल्यामुळे महिलेला तिहेरी तलाकची धमकी

तेलंगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध! दगडफेकीनंतर जमावबंदी लागू

… म्हणून इम्रान खान यांनी केलं भारताचं कौतुक

यापूर्वीही मुंबई शहरावरुन अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेत बराच वाद रंगला होता. त्यानंतर कंगना रणौत हिच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात महापालिकेला फटकारलेही होते. गेल्या काही महिन्यांत शिवसेनेवर निशाणा साधणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यालाही मुंबई महापालिकेकडून अशीच नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व कारवाई सूडबुद्धीने सुरू असल्याचे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे.

Exit mobile version