मुंबई महापालिकेच्या निवडणूका अवघ्या काही दिवसांवर ठेपलेल्या असतानाच मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना हा अर्थसंकल्प सादर केला आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात अनेक ‘भरीव’ तरतुदी करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पावर मुंबई भाजपाचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी सडकून टीका केली आहे. ‘हा कॉन्ट्रॅक्टरची धन करणारा महापालिकेचा अर्थसंकल्प…’ असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे.
शिवसेना शासित मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प म्हणजे बोगस बजेट आहे. गेल्या वर्षभरात ४०% इतकाही भांडवली खर्च महापालिकेने केला नाही आणि १०० टक्के खर्च केला तो पण कोस्टल रोडचा. तो खर्च केला कारण कॅगने ताशेरे ओढले. विनाकारण पेमेंट केल्याचे म्हटले म्हणूनच तो खर्च झाला असा आरोप आमदार अरुण भातखळकरांनी केला आहे. तर आंतरराष्ट्रीय शाळा निर्माण करणार असे सांगून मराठी शाळा विकण्याचा घाट महापालिकेने घातला आहे असेही ते म्हणाले.
हे ही वाचा:
नगरच्या गिर्यारोहकांचा नाशिक मध्ये मृत्यू
U19 WC: भारताचे निर्विवाद ‘यश’! ऑस्ट्रेलियाला ‘धुल’ चारत अंतिम फेरीत धडक
निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात ‘भरीव’ तरतुदी
उज्ज्वल निकम म्हणतात, नितेश राणे प्रकरणाचा निष्कारण फुगा केला गेला!
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कर वाढवला नाही असे सांगितले जात लेपन आमचा दबाव असताना तुम्ही कर वाढवूच शकत नव्हतात असा दावा भातखळकर यांनी केला आहे. उलट कोविड परिस्थिती लक्षात घेता कर कमी करण्याची आवश्यकता होती जे महापालिकेने केले नाही असा हल्लाबोल अतुल भातखळकरांनी केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकराला जो मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांच्या तोंडाला पाने पुसणारा आणि काँट्रॅक्टर्सना मदत करणारा, भ्रष्टाचाराला वाव देणारा हा अर्थसंकल्प आहे असे भातखळकर म्हणाले.
हा तर कॉन्ट्रॅक्टरची धन करणारा महापालिकेचा अर्थसंकल्प… pic.twitter.com/ZCHpOXj8t4
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 3, 2022