राणेंच्या ‘अधिश’वर पुन्हा महापालिकेचं पथक दाखल  

राणेंच्या ‘अधिश’वर पुन्हा महापालिकेचं पथक दाखल  

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील ‘अधिश’ बंगल्याबाबत कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेचे पथक पोहचले आहे. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांच्या ‘अधिश’ बंगल्याला नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आज महापालिकेचे नऊ अधिकारी सांताक्रुज पोलीस ठाण्यात प्रथम पोहचले, तिथून त्यांनी पोलीस संरक्षण घेतले आणि तिथून ते ‘अधिश’ बंगल्यावर पोहचले आहेत. नारायण राणे हे स्वतः बंगल्यात उपस्थित असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्त्याने अनधिकृत बांधकामप्रकरणी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन मुंबई महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याची तपासणी केली होती. तसेच पथकाने बंगल्यातील बांधकामांचे मोजमाप घेऊन संबंधित कागदपत्रांची तपासणीही केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आज पुन्हा पथक या बंगल्यावर पोहचले असून ते कागदपत्रांची पडताळणी आणि नारायण राणेंशी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे.

हे ही वाचा:

‘सुडाचे राजकारण कोण करते आहे ते जनता बघत आहे’

बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची कर्नाटकमध्ये हत्या

लालूप्रसाद यादवांच्या शिक्षेवर आज सुनावणी

मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाचा प्रश्न ‘केंद्र’स्थानी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या बंगल्यातील बांधकामाची तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली होती. मुंबई महापालिकेने पाठवलेल्या नोटीसमध्ये नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्याचे म्हटले असून महापालिकेच्या के पश्चिम विभागाकडून ही नोटीस देण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी २०१७ मध्ये बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार केली होती.

Exit mobile version