एक कोटी वॅक्सीन टेंडरची सगळी कागदपत्रे जनतेसमोर आणा

एक कोटी वॅक्सीन टेंडरची सगळी कागदपत्रे जनतेसमोर आणा

एक कोटी वॅक्सीन टेंडरची सगळी कागदपत्रे जनतेसमोर आणा असे खुले आव्हान भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना दिले आहे. मुंबई महापालिकेचे ग्लोबल टेंडर हा शंभर कोटीचा घोटाळा असल्याचा आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे. टेंडर भरणाऱ्या नऊ कंपन्यांपैकी काही कंपन्या बोगस असल्याचे सोमैय्या यांचे म्हणणे आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवार, ६ जून रोजी ग्लोबल टेंडर रद्द करण्यात आल्याचे घोषित केले. या ग्लोबल टेंडरसाठी काही पुरवठादारांनी भाग घेतला होता. प्रत्यक्ष लस उत्पादन करणाऱ्या कंपन्या त्यात नव्हत्या. मात्र या पुरवठादारांची कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने हे टेंडर रद्द झाले आहे. महापालिका आता यासाठी नव्याने प्रयत्न करणार आहे, असेही त्या म्हणाल्या. लसींचा साठा उपलब्ध होईल असे आमचे प्रयत्न आहेत. स्पुटनिकचे वितरण करणाऱ्या रेड्डीज लॅबशी चर्चा केली आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. जूनअखेरपर्यंत त्यांनी तशी तयारी दाखविली आहे.

हे ही वाचा:

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडूंच्या अकाउंटवरील ‘ब्लू टीक’ ट्विटरने काढली

पालिकेच्या ट्विटर अकाऊंटसाठी कोटींची उधळण

ग्लोबल टेंडरचा फुगा फुटला

महिलांना पुन्हा एकदा लोकल प्रवासाची मुभा

या साऱ्या प्रकरणावरुन भाजप नेते किरीट सोमैय्या आक्रमक झाले आहेत. याआधीच सोमैय्या यांनी महापालिकेच्या ग्लोबल टेंडरींग हा घोटाळा असल्याचा आरोप केला होता. त्यात कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे टेंडरिंग रद्द झाल्यामुळे सोमैय्या आणखीनच संतापले आहेत. त्यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना खुले आव्हान दिले आहे. महापालिकेच्या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद देताना ज्या ९ कंपन्यांनी बीड केले आहे, त्यातली एक कंपनी ही फक्त लेटरहेड कंपनी आहे तर एक कंपनी बिडिंगच्या फक्त दोन दिवस आधी बनवण्यात आली आहे असा आरोप सोमैय्या यांनी केला आहे. तर हा शंभर कोटीचा घोटाळा असून आम्ही तो उघडकीस आणला असे दावा सोमैयांनी केला आहे.

Exit mobile version