30 C
Mumbai
Monday, November 4, 2024
घरराजकारणमुंबई महानगरपालिकेकडून लसींसाठी ग्लोबल टेंडर

मुंबई महानगरपालिकेकडून लसींसाठी ग्लोबल टेंडर

Google News Follow

Related

मुंबई म्हणजे महाराष्ट्र नव्हे- गणेश बिडकर

राज्यात सध्या कोविडचा कहर वाढलेला आहे. अशा वेळेस लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आता पावले उचलत लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे ठरवले आहे. या टेंडरद्वारे १ कोटी लसींची मागणी केली आहे. कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर (जागतिक निविदा) काढणारी मुंबई महानगरपालिका ही देशातली पहिली महानगरपालिका ठरली आहे.

मागणी नोंदवल्यानंतर लस पुरवठा पुढील तीन आठवड्यात व्हायला हवा. टेंडर भरणाऱ्या कोविड लस पुरवठादार कंपनीला डिसीजीआय आणि आयसीएमआरचे निकष पूर्ण करणे अत्यावश्यक असेल.

जगभरातील लस पुरवठादार कंपन्या या १२ मे ते १८ मे या कालावधीत ‘जागतिक निविदा’ भरु शकतील. लसींचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांसाठी १८ मे हा ग्लोबल टेंडर भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. तर भारताच्या सीमेलगत असणाऱ्या देशांमधून येणारे कंत्राटदार हे टेंडर भरु शकणार नाहीत.

हे ही वाचा:

उपमुख्यमंत्र्यांची ‘सोशल’ उधळपट्टी

मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला झापले

शिवसेना मंत्र्याला न्यायालयाची चपराक

‘लॅन्सेट’च्या भारतविरोधी लेखामागे ‘चायनाचा हात’

निविदा भरणाऱ्या कंपन्यांसाठी मुंबई महापालिकेची नियमावली :

१) टेंडर भरणाऱ्या कंपनीनं सर्व कर आणि खर्च मिळून प्रति लस एकत्रित रक्कम नमुद करावी. सध्या महापालिकेकडे अलसलेल्या कोल्ड स्टोरेजच्या क्षमतेपेक्षा जास्त आणि वेगळ्या कोल्ड स्टोरेजची गरज पडल्यास ती अतिरीक्त कोल्ड स्टोरेज आणि कोल्ड चेनची गरज पुरवठादार कंपनीनं भागवावी. मुंबईत सध्या २० हॉस्पिटल, २४० लसीकरण केंद्रे आहेत.

२) ६० टक्क्यांपेक्षा कमी रेस्युडिअल शेल्फ लाईफ असणारी लस स्वीकारली जाणार नाही.

३) प्रथम पसंती दिलेला कंत्राटदार ठराविक मुदतीत लस पुरवठा करू शकला नाही तर निकष पूर्ण करणाऱ्या दुसऱ्या कंपनीस कंत्राट देण्याचा विचार केला जाऊ शकेल.

४) निकष पूर्ण करणाऱ्या एकापेक्षा अधिक कंपन्यांकडून देखील लस खरेदी केली जाऊ शकेल. लस खरेदीसाठी कुठलीही आगाऊ रक्कम दिली जाणार नाही.

५) जर लस पुरवठा दिलेल्या वेळेत झाला नाही तर प्रतिदिन १ टक्का याप्रमाणे किंवा संपूर्ण कंत्राटच्या १० टक्के यात जी अधिक असेल ती रक्कम दंड म्हणून वसूल केला जाईल.

६) जर लस पुरवठा समाधानकारकरित्या झाला नाही आणि दर्जा खराब आढळला तर कंत्राटदारास काळ्या यादीत टाकून पुढील कारवाई केली जाईल.

गणेश बिडकरांची टीका

दरम्यान मुंबई महानगरपालिकेला जागतिक निविदा काढायला परवानगी दिल्यानंतर पुण्यातील भाजपा नगरसेवक गणेश बिडकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीटरवरून एकामागोमाग एक ट्वीट करत फक्त मुंबईला जागतिक निविदा काढायला परवानगी देण्यावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.

पुणे महानगरपालिकेने जागतिन निविदेसाठी २० एप्रिललाच परवानगी मागितली होती. मात्र ती अजून त्यांना देण्यात आलेली नाही. त्यावरून त्यांनी सरकारव टीकेची झोड उठवली. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की,

तुम्हाला येणाऱ्या मुंबई निवडणुकांची काळजी लागली असली आणि त्यासाठी पी.आर. एजन्सीज कामाला लावणे, लगेच टेंडर काढणे अशा गोष्टी सुरू असल्या, तरी जरा मुंबईबाहेर बघा. बाकीच्या महाराष्ट्रात ही माणसे राहतात हे विसरू नका, नाहीतर जनता माफ करणार नाही.

त्यासोबतच्या आणखी एका ट्वीटमध्ये त्यांनी ‘मुंबई म्हणजे महाराष्ट्र’ नव्हे असे देखील सरकारला सुनावले आहे. ते म्हणतात,

मुंबई म्हणजे महाराष्ट्र नव्हे ! पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

काल ट्विट करतात आणि आज ग्लोबल टेंडर निघते, पण पुण्याने २० एप्रिलला पत्र देऊनही अजून त्यावर काहीच कारवाई नाही. मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा कोणीतरी हे सांगायला हवे, की मुंबई म्हणजे महाराष्ट्र नव्हे!

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा