भूमिपुत्रांवर बुलडोझर! मराठी टक्का टिकणार कसा?

भूमिपुत्रांवर बुलडोझर! मराठी टक्का टिकणार कसा?

दादर येथील प्रसिद्ध अशा मासळी बाजारावर शिवसेना शासित मुंबई महापालिकेने बुलडोझर फिरवला आहे. परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पालिकेतर्फे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातर्फे ही कारवाई करण्यात आली आहे. पण या परिसरातील टोलेजंग टॉवरमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या आग्रहाने ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मुंबईतील मराठी टक्का टिकणार तरी कसा? असा सवाल विचारला जात आहे.

कोणतीही नोटीस न देता कारवाई?
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली त्यावेळी या विक्रेत्यांच्या विरोधाला न जुमानता दादर मच्छी मार्केट जमीनदोस्त करण्यात आले. पण महापालिकेने ही कारवाई करण्याआधी विक्रेत्यांना मच्छी मार्केट खाली करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या नोटिसा दिल्या नसल्याचा आरोप या विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. पण पालिकेच्या जी/ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी हे आरोप फेटाळले आहेत. रीतसर नोटीस बजावून नंतरच ही कारवाई केल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.

विक्रेत्यांचे स्थलांतर
या कारवाईनंतर दादर मच्छी मार्केटमधील मासे विक्रेत्यांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. या विक्रेत्यांना ऐरोली आणि मरोळ या दोन ठिकाणी हलवण्यात येणार आहे. यामध्ये घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही प्रकारच्या व्यापाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी २७ घाऊक विक्रेत्यांना ऐरोली येथे अद्ययावत जागा देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. तर १० किरकोळ व्यापाऱ्यांना अंधेरी मरोळ येथील बाजारात स्थलांतरीत केले जाणार आहेत.

हे ही वाचा:

गेले देशमुख कुणीकडे?

आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो?

नीरज चोप्राचा ‘असा’ होणार सन्मान

पत्नीला गावावरून बोलवण्यासाठी त्याने मुलांनाच लावले पणाला!!

कारवाईचे नेमके कारण काय?
दादर येथील या मच्छी मार्केटमध्ये हैदराबाद आणि विशाखापट्टणम येथून गोड्या पाण्यातील मासळी आयात करून त्याची घाऊक विक्री करण्यात येत असे. पण हे मासे घेऊन येणाऱ्या ट्रक्समुळे दादरच्या सेनापती बापट मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचे कारण पुढे करत या मच्छी मार्केटवर बुलडोझर फिरवला गेला असला तरीही या कारवाई मागचे खरे कारण काय? असा सवाल विचारला जात आहे. मच्छी मार्केट परिसरातील रहिवासी असलेल्या नागरिकांकडून या मासळी बाजाराबद्दल कायमच तक्रार केली जात होती. त्यासाठी दुर्गंधी आणि घाणीचे कारण दिले जात होते. त्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका प्रिती पाटणकर या कारवाईसाठी आग्रही होत्या. तर दुसरीकडे सध्या ऑनलाईन मासे विक्रीचे जाळे फोफावत चालले आहे. त्यामुळे, हे तर या कारवाईमागचे कारण नाही ना? अशी चर्चा रंगताना दिसत आहे

मतांवर डोळा ठेवून शिवसेना कारवाईसाठी आग्रही?
दादर मच्छी मार्केट परिसरातील शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका प्रिती पाटणकर या सातत्याने मच्छी मार्केट हटवण्यासाठी पाठपुरावा करत होत्या. अशातच आता या मच्छी मार्केटवर कारवाई करण्यात अली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना करण्यात आलेली ही कारवाई चांगलीच नजरेत भरणारी आहे. आगामी महापालिका निवणुकीच्या दृष्टीने मतांवर डोळा ठेवून या कारवाईसाठी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आग्रही होती का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मराठी टक्केवारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!
काही दिवसापूर्वीच ठाकरे सरकारचे रिमोट कंट्रोल असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठी टक्का टिकवा असे सांगितले होते. पण शिवसेनेची सत्ता असलेली मुंबई महापालिका भूमिपुत्रांच्याच व्यवसायांवर बुलडोझर फिरवून त्यांना स्थलांतरित करणार असेल, तर मुंबईतील मराठी टक्का टिकणार तरी कसा? असा सवाल विचारला जात आहे.

Exit mobile version