मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल हे कोरोना काळातील घोटाळ्याप्रकरणीच्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर कोरोनाच्या काळात कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरण खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ईडीने आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना समन्स पाठवले.सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. ईडीच्या कार्यालयात दाखल होण्यापूर्वी चहल यांनी राज्यातील सर्वच महापालिका आयुक्तांची ईडीने चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने कोरोनाकाळात मुंबई महापालिकेत घेण्यात आलेल्या निर्णयांची कॅगमार्फत चौकशी करण्याचा निर्णय आहे . याशिवाय वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर आता पालिका आयुक्त चहल यांना ईडीनं नोटीस जारी असून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. कोरोना काळात केलेली कामे आणि घेतलेले निर्णय या प्रकरणी ईडी चौकशी करणार आहे.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना सोमय्या म्हणाले , १४० दिवसांपूर्वी आझाद मैदान पोलीस ठाण्यात जम्बो कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणी सुजित पाटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या संदर्भातील सर्व कागदपत्रे ही मुंबई पोलिसांनी जप्त केली पाहिजेत. तशा प्रकारची मी विनंती आता केली आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.
हे ही वाचा:
शर्मिला ठाकरे यांची उर्फी प्रकरणावर एका वाक्यात प्रतिक्रिया
देशातील दहशतवादी घटनांमध्ये ७० टक्क्यांनी घट
भाजप मिशन २०२४ साठी रणनीती आखणार
कथित १००कोटींच्या कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी बीएमसी आयुक्त इक्बाल चहल यांची चौकशी सुरू आहे. चहलवर कोविड सेंटरचे कंत्राट बेनामी कंपन्यांना दिल्याचा आरोप आहे. कोरोनाच्या काळात बीएमसीने कोविड सेंटरमधील वैद्यकीय सेवांसाठी अनेक बाह्य कंपन्यांना कंत्राट दिले होते. यातील बहुतांश कंपन्यांना वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव नसतानाही त्यांना कंत्राटे देण्यात आली. हा १०० कोटींचा घोटाळा असल्याचे सांगण्यात येत आहे.