केंद्र सरकार आणि सोशल मीडिया ट्विटर यांच्यात नवीन आयटी नियमांवरुन अद्यापही तणाव सुरु आहे. ट्विटर वगळता देशातील सर्व प्रमुख सोशल मीडिया कंपन्यांनी केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आता तर ट्विटरने कहर केला आहे, थेट भारताच्या उपराष्ट्रपतींच्या अकाउंट वरून ‘ब्लू टीक’ काढून टाकली होती. काही काळातच लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया बघून ट्विटरने ब्लू टीक पुन्हा बहाल केली आहे.
‘ब्लू टीक’ हे ट्विटरमधील हे मानक आहे. ‘ब्लू टीक’ हे व्हेरीफाईड अकाउंट्स दर्शवतात. अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या, कंपन्यांच्या किंवा संस्थांच्या अधिकृत अकाउंटवर ‘ब्लू टीक’ असते. यामुळे या अकाउंट्स वरून केलेल्या ट्विट्सचा रिच म्हणजेच प्रसार वाढतो. ट्विटरने ज्या प्रकारे आज उपराष्ट्रपती वेंकय्या नायडूंच्या अकाउंट वरून ‘ब्लू टीक’ काढली त्याचप्रकारे याच वर्षीच्या जानेवारी महिन्यात अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट ट्विटरने कायमचे बॅन केले होते.
हे ही वाचा:
बीडमध्ये कितीही हजार पोलिसांचा बंदोबस्त असला, तरी मोर्चा निघणार
महिलांना पुन्हा एकदा लोकल प्रवासाची मुभा
राज्याचा प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो
‘आम्ही भजन करण्यासाठी पक्ष चालवत नाही’
ट्विटरने आज सार्वभौम भारताच्या उपराष्ट्रपतींच्या अकाउंटवरील ब्लू टीक काढल्याने नेटकऱ्यांमध्ये भयंकर संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा करणाऱ्या ट्विटरनेच आज अभिव्यक्तीचा गळा दाबण्याचं अजून एक उदाहरण दिलं. यापूर्वी ट्विटरने गेल्याच महिन्यात प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रानौतचं अकाउंट सस्पेंड केलं होतं.