फारूख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सला खिंडार!

जम्मू काश्मीरमधील अनेक पक्षनेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

फारूख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सला खिंडार!

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला खिंडार पडले आहे. जम्मू काश्मीरच्या कठुआ जिल्ह्याचे नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच, जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि समर्थकांनी नॅशनल कॉन्फरन्समधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.जम्मूमधील भाजपच्या मुख्यालयात भाजपचे जम्मू आणि काश्मीर युनिटचे प्रमुख रविंदर रैना यांच्या नेतृत्वाखाली या सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. कोणत्याही धर्म आणि प्रदेशामध्ये भेदभाव न करता सर्वांच्या कल्याणासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे रैना यांनी यावेळी अधोरेखित केले.

‘भाजपने आरोग्यसेवा, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि सामाजिक-आर्थिक विकासात मिळवलेले यश आणि केलेली कामगिरी ही ऐतिहासिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे आणि त्यांच्या समर्पित योगदानामुळे भारताची घोडदौड सुरू आहे,’ असे रैना यांनी यावेळी नमूद केले. भाजपचे वरिष्ठ नेते देविंदरसिंग राणा यांनीही भाजपची सर्वसमावेशक भूमिका अधोरेखित केली. आमच्या पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत प्रेमाने आणि सौहार्दाने केले जाते, असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

‘ऍनिमल’साठी रणबीर कपूर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता; तर, आलिया भट्ट ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री!

इटलीचा यानिक सिनर ऑस्ट्रेलिया ओपनचा विजेता!

तव्यावर बसून आशीर्वाद देणाऱ्या गुरुदास बाबावर बलात्काराचा गुन्हा दाखल!

प्रेमप्रकरणातून हिंजवडीत आयटी इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या!

कठुआ जिल्ह्याचे नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष संजीव खजुरिया यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करून त्यांच्यामुळे तळागाळापर्यंत कल्याणकारी योजना पोहोचल्या असल्याचे नमूद केले. तसेच, जागतिक पातळीवरही भारत नावाजला जात आहे, याचे सर्व श्रेय मोदींना जाते, असेही ते म्हणाले.

तत्पूर्वी एका स्वतंत्र कार्यक्रमादरम्यान माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते कविंदर गुप्ता यांनी त्यांच्या पक्षकार्यकर्त्यांना बूथस्तरावरच पक्ष अधिक बळकट करण्याचे आवाहन करून आगामी निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार केला. यावेळी अनेक महिलांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी गुप्ता यांनी लोकांची सेवा करण्याच्या आणि जम्मू-काश्मीरला भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देण्याच्या भाजपच्या वचनबद्धतेवर भर दिला. त्यांनी मतदारांपर्यंत, विशेषतः महिला आणि तरुणांपर्यंत पोहोचण्याच्या महत्त्वावर भर दिला. ज्येष्ठ नेत्या रेखा महाजन यांनी नवीन सदस्यांचे स्वागत केले आणि बूथस्तरावर भाजपचा पाया मजबूत करण्यासाठी समर्पित भावनेने काम करण्याचे आवाहन केले.

Exit mobile version