१ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त उत्तर भारतीय संघाच्या वतीने संघ भवन, वांद्रे पूर्व येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २०० हून अधिक बाटल्या रक्त संकलित करण्यात आले आहे. उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष संतोष आर.एन. सिंग यांनी सर्वप्रथम रक्तदान करून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. रविवारी, १ मे रोजी दुपारी 3 वाजल्यापासून आयोजित करण्यात आलेला हा कायर्क्रम ८ वाजेपर्यंत चालला. यावेळी उत्तर भारतीय संघ कार्यकारिणीचे सदस्य आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उत्तर भारतीय संघटनेचे अध्यक्ष संतोष आर.एन.सिंग म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्राने उत्तर भारतीयांना प्रेम आणि सन्मान दिले आहे. म्हणून मुंबई आणि महाराष्ट्राच्या सेवेत आपण थोडेफार हातभार लावणे हे उत्तर भारतीयांचेही कर्तव्य आहे. या उद्देशाने या रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते.रक्तदान शिबिरात 200 हून अधिक बाटल्या रक्त जमा झाल्याचे त्यांनी सांगितले. येथील जेजे रुग्णालयाच्या टीमने खूप सहकार्य केले. या शिबिराला ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभल्याचे संतोष आर.एन.सिंग यांनी सांगितले आणि तरुणांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.
सर्वात प्रथम संतोष आर.एन.सिंग यांनी रक्तदान करून या शीबिराची सुरवात केली. या शिबिरात उत्तर भारतीय संघाशी संबंधित राधेश्याम तिवारी, उत्तर भारतीय संघाचे युवा अध्यक्ष संजय सिंह, मुंबई भाजपा उपाध्यक्ष अमरजीत सिंग, देवेंद्र तिवारी, काँग्रेस नेते अवनीश सिंग, जयप्रकाश सिंग लोकगायक सुरेश शुक्ला यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
हे ही वाचा:
‘४८ तासांत उद्धव, संजय राऊत माफी मागा…’
वीजसंकटावर गृहमंत्री अमित शहा उचलणार पाऊल
बर्लिनमध्ये लहान मुलीच्या चित्राचे केले पंतप्रधान मोदींनी कौतुक
‘शिवसेना नेत्यांना बुद्धिदोष झाला आहे’ आशीष शेलारांची टीका
दरम्यान,उत्तर भारतीय संघातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही कोरोना संसर्गाच्या वेळी मुंबईतील रुग्णालयांमध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता, तेव्हा उत्तर भारतीय संघटनेतर्फे महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एक हजार बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.