अंध मोदी विरोधक यातून बोध घेतील का?

अंध मोदी विरोधक यातून बोध घेतील का?

कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आयएसआयएसने भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. बांगलादेश मार्गे पश्चिम बंगालमधून भारतात येणारे दहशतवादी हे सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात आले आहेत.

या विषयावर भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनीही ट्विट केले आहे. “बांगलादेशातून भारतात घुसखोरी करून ओळख लपविण्यासाठी भारतीय महिलांशी लग्न करण्याचे अतिरेक्यांचं मोठं कारस्थान उघड झाले आहे. एनआरसीला अंधपणे विरोध करणारे मोदी सरकार विरोधक या बातमीतून योग्य तो बोध घेतील काय?” असं ट्विट अतुल भातखळकरांनी केलं आहे.

भारतात घुसखोरी केलेल्या अतिरेक्यांना आपली ओळख लपविण्यासाठी लग्न हे सोपं माध्यम आहे. या माध्यमातून त्यांना भारताचा नागरिक असल्याचं सिद्ध करण्यासाठी मोठी मदत होते. तसेच स्थानिक पातळीवर रुळण्यास मदत होते. त्यामुळे लग्न हे त्यांचं एकप्रकारे सुरक्षा कवच बनतं.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंच्या प्रेरणेने तलवार नाचवली

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात रेल्वेनिर्णयाचा एकच डोस, बाकी ओस

केवळ दोन डोस घेतलेल्यांनीच मॉलमध्ये जा…..वाचा सविस्तर!!

लक्ष विमान प्रवाशांची संख्या झेपावण्याकडे

आरोपी इतके हुशार असतात की ते आपली ओळख लपवण्यासाठी धर्म परिवर्तनही करतात. कोलकाता पोलिसांनी पकडलेला अतिरेकी पावेल याने याच माध्यमातून आपली ओळख लपवली होती. त्याचं जयराम बेपारी असं हिंदू नाव आहे. त्याने आणि त्याचा सहकारी मेकैल खान उर्फ शेख शब्बीर यांनी हरिदेवपूर भागातील दोन महिलांसोबत मैत्री केली. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर पुढच्या महिन्यात लग्नाची योजना बनवली.

Exit mobile version