पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्गार
काली या चित्रपटाच्या पोस्टरवरून देशात वाद सुरु आहे. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठे विधान केले आहे. माता कालीचे देशावर आशीर्वाद आहेत. माता काली संपूर्ण भारताच्या भक्तीचे केंद्र आहे. देशात माता कालीच्या पोस्टरवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी हे पहिलेच विधान केले आहे.. कोलकाता येथे रामकृष्ण मिशनने आयोजित केलेल्या स्वामी आत्मस्थानंद यांच्या शताब्दी सोहळ्याला पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. त्यांवेळी त्यांनी हे विधान केले आहे.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणादरम्यान म्हटले की, जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी बेलूर मठ आणि काली मंदिराला भेट दिली. जेव्हा तुमची श्रद्धा शुद्ध असते, तेव्हा शक्ती स्वतः तुम्हाला मार्ग दाखवते. माता कालीचे आशीर्वाद सदैव भारतावर आहेत. आज भारत या अध्यात्मिक उर्जेने विश्व कल्याणाच्या भावनेने पुढे जात आहे.
Prime Minister Narendra Modi speaks reverentially about Maa Kaali being the center of devotion, not just for Bengal but whole of India. On the other hand, a TMC MP insults Maa Kaali and Mamata Banerjee instead of acting against her, defends her obnoxious portrayal of Maa Kaali… pic.twitter.com/6O4vYGkasi
— Amit Malviya (@amitmalviya) July 10, 2022
मानवतेच्या सेवेसाठी रामकृष्ण मिशनचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील संत हे राष्ट्रीय एकात्मतेचे दूत म्हणून ओळखले जातात आणि परदेशात भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यानंतर भाजपा आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी ट्विट करत ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी माता कालीबद्दल भक्तिभावाने बोलले, ती केवळ बंगालसाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी श्रद्धेचे केंद्र आहे.
हे ही वाचा:
डॅशिंग IRS अधिकारी समीर वानखेडे यांचा सन्मान
एलन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्सचा ट्विटर खरेदी करार केला रद्द!
गीता गोपीनाथ ‘आयएमएफ’च्या भिंतीवर झळकलेल्या पहिल्या महिला अर्थशास्त्रज्ञ
शिंदे- फडणवीस सरकारकडून मराठा समाजासाठी ३० कोटींचा जीआर
दरम्यान,लीना मणिमेकलाई यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या काली या माहितीपटाचे पोस्टर शेअर केले होते. यामध्ये काली माता सिगारेट ओढताना दाखवण्यात आली आहे. हे पोस्टर समोर आल्यानंतर देशभरात वाद सुरू झाला आहे.