पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगणा मध्ये बॉम्बहल्ला, हिंसाचाराचा केवळ ट्रेलर?

पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगणा मध्ये बॉम्बहल्ला, हिंसाचाराचा केवळ ट्रेलर?

पश्चिम बंगालचे भाजपाचे नेते आणि खासदार अर्जुन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगणा जिल्ह्यातील भटपारा भागातील जगद्द्ल भागात काल (१७ मार्च) पंधरा ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. पोलिसांनी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे देखील या हल्लेखोरांनी तोडले.”या हल्ल्यात एका मुलासह एकूण ३ व्यक्ती जखमी झाल्याची माहिती, एसीपी एपी चौधरी यांनी दिली आहे.

या हल्ल्याकरता तृणमूल काँग्रेसला जवाबदार ठरवत भाजपाचे पश्चिम बंगालमधील प्रभारी कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, तृणमूल काँग्रेस हा हिंसेच्या राजकारणाचा समानार्थी शब्द आहे.

“टीएमसी हा राजकीय हिंसेचा समानार्थी शब्द आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांची तैनाती करून देखील इथे (टीएमसीचे) गुंड गोळीबार करतात, बॉम्ब फेकतात. निवडणूक आयोगाने याची गांभीर्याने दाखल घेण्याची गरज आहे, अन्यथा या भागात निवडणूक शांततामय मार्गाने होतील असं वाटत नाही.” असे विजयवर्गीय म्हणाले.

हे ही वाचा:

उरातला साधेपणा हे मनोहर पर्रिकरांचे वैशिष्ट्य होते

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा-नारायण राणे

पुण्यात कोविड-१९ मुळे चिंताजनक परिस्थिती, लवकरच लॉकडाऊन?

पश्चिम बंगाल भाजपाचे नेते मुकुल रॉय यांनी या प्रकरणात निवडणूक आयुगाकडे तक्रार करणार असल्याचेही सांगितले आहे.

पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराचा इतिहास खूप मोठा आहे. बंगालमध्ये १९७० च्या दशकापासूनच राजकीय हिंसाचार मोठ्या प्रमाणात होत आहे. काँग्रेस पक्षाने सुरु केलेला हिंसाचार डाव्या पक्षांनी मोठ्या प्रमाणात वाढवला आणि आता त्या हिंसाचाराला ममता बॅनर्जींनी वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या निवडणुकीत राजकीय हिंसा मोठ्या प्रमाणात होणार यावर शंकाच नाही. निवडणूक आयोगाने हे टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात केंद्रीय पोलीस दलाची नियुक्ती बंगालमध्ये करण्याची आवश्यकता असल्याची मागणी भाजपाने अनेक वेळा केली आहे.

Exit mobile version