दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी स्वीय सहाय्यक बिभव कुमार यांना खासदार स्वाती मालीवाल यांना केलेल्या कथित मारहाणी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. स्वाती मालीवाल यांच्या जबाबानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, बिभव कुमार यांना अटक झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून भाजपाला इशारा दिला आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयासमोर ‘जेल भरो’ कार्यक्रमाची घोषणा केली आहे. यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान नव्या वादाला तोंड फुटले आहे.
आम आदमी पक्षाने दिल्लीत चांगलं काम केलं, भाजपाला ते जमत नाही म्हणूनच भाजपा आम्हाला त्रास देत असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, “आपचे सर्व नेते रविवार, १९ मे रोजी दुपारी १२ वाजता मुख्यालयात जाऊन अटकेची मागणी करणार आहेत. रोज एका एका नेत्याला विनाकारण अटक करण्याचे सत्र सुरू आहे. त्यापेक्षा जी काही अटक करायची ती सर्वांना एकदाच करा, अशी मागणी केजरीवाल करणार आहेत.”
“आम आदमी पक्षाच्या मागे का लागले आहेत हे लोक. एकेकाला हे तुरुंगात टाकत आहेत. संजय सिंहांना तुरुंगात टाकलं, माझ्या पीएला टाकलं. आता हे म्हणतात की राघव चढ्ढा यांनाही जेलमध्ये टाकणार. सौरभ, अतिशी यांनाही तुरुंगात टाकणार. मी हा विचार करतोय की हे आम्हाला तुरुंगात का टाकत आहेत. आमचा गुन्हा काय?” असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :
काँग्रेसचा बचाव करण्यासाठी सरसावले राजदीप; अल्पसंख्य नव्हे गरिबांसाठी होत्या योजना
काँग्रेसचा बचाव करण्यासाठी सरसावले राजदीप; अल्पसंख्य नव्हे गरिबांसाठी होत्या योजना
काँग्रेसच्या भूलथापांना मतदार फसणार नाहीत
पुढील हंगामात हार्दिकचे ‘एका सामन्याच्या बंदी’ने स्वागत!
आम आदमी पक्षाने चांगलं काम केलं म्हणून भाजपा त्रास देत आहे. एकेकाला जेलमध्ये टाकलं जात आहे. त्याऐवजी लोकांची कामे होऊ नयेत, त्यांना चांगल्या सुविधा मिळू नयेत, चांगल्या शाळा आरोग्य सुविधा यापासून ते वंचित राहावेत असं वाटत असेल तर आम्हाला सगळ्यांना एकदाच अटक करा, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.