पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचाच निवडणुकीत पराभव झाला. बहरामपूर मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढवणाऱ्या युसुफ पठाण यांनी अधीर रंजन चौधरी यांचा पराभव केला. ममतांशी न केलेल्या आघाडीबाबत त्यांना विचारले असता, त्यांनी स्पष्टीकरण दिले. बंगाल काँग्रेसचे नेते दिल्लीत काँग्रेसच्या बैठकीत सहभागी झाले. एक-दोन अपवाद वगळता सर्वांनी तृणमूलसोबत आघाडी योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट केले होते. हे सांगणारा मी एकमेव नव्हतो. आता याचे खापर माझ्यावर फोडले जात आहे,’ असे चौधरी म्हणाले.
‘मी माझ्या पक्षाला सांगितले होते की, मला कोणासोबत आघाडी करण्यात काहीच हरकत नाही. मात्र मी त्यांना सांगितले होते की, जोपर्यंत मी बंगालमध्ये काँग्रेसची धुरा सांभाळतो आहे, तोपर्यंत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी कोणतीही आघाडी होऊ शकणार नाही. मी पक्षाला सांगितले होते की, कोणत्याही नव्या व्यक्तीची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करा आणि त्यांच्याशी थेट बोला, मला कोणतीही अडचण नसेल. मात्र ते मला पक्षाचा चेहरा करून तृणमूलशी चर्चा करायला सांगत असतील, तर ते कदापि होणार नाही,’ असे त्यांनी सांगितले.
‘पराभव हा पराभवच असतो. मी माझ्या वतीने शक्य तेवढे प्रयत्न केले. मात्र मी यशस्वी होऊ शकलो नाही. मी पाचवेळा निवडणूक जिंकलो आहे. या वेळी भाजपला अधिक मते मिळाली आहेत, असे ऐकिवात आहे,’ अशी प्रतिक्रिया चौधरी यांनी पराभवानंतर दिली.
‘पश्चिम बंगालमध्ये सत्तारूढ पक्षाने वेगळीच मोहीम चालवली. त्यांनी उमेदवार बाहेरून आयात केले. मला यावर कोणताही आक्षेप नाही. युसुफ पठाण आले आणि अल्पसंख्याकांना सांगू लागले की, त्यांनी ‘भाई’ला मत द्यावे, ‘दादा’ला नाही,’ असे ते म्हणाले. दादाचा अर्थ हिंदू आणि भाईचा मुसलमान होतो.
हे ही वाचा:
‘हमारे बारह’ चित्रपटाला स्थगिती मिळाल्यानंतर इस्लामवाद्यांकडून कलाकारांना धमक्या
‘राहुल गांधी निवडणुकीतील पराभव सहन करू शकले नाहीत’
मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली
विशालने विझवली मशाल, खर्गेंना दिले पाठिंब्याचे पत्र!
‘मात्र माझी कोणतीही तक्रार नाही. युसुफ पठाण एक चांगली व्यक्ती आहेत. त्यांनी माझ्याविरोधात एक शब्दही उच्चारला नाही. ते एक खेळाडू आहेत आणि खेळाडूप्रमाणे लढले. आमचा लढा सत्ताधाऱ्यांविरोधात होता. त्यांच्याजवळ संघटन आहे. सर्व पंचायती व नगरपालिकांवर त्यांचे नियंत्रण आहे. माझा जिल्हा खूप गरीब आहे आणि प्रवासी श्रमिकांचे केंद्र आहे,’असे त्यांनी सांगितले.