राज्यावर कोणतंही संकट आलं की केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी ढकलणं हीच आता महाराष्ट्राची ओळख झाली आहे, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातील आघाडी सरकारला फटकारले आहे.
रावसाहेब दानवे यांनी मीडियाशी संवाद साधताना आघाडीला फटकारले आहे. कोविड संक्रमणाचा प्रादूर्भाव नियंत्रित करण्यात महाराष्ट्र सरकार प्रत्येक बाबतीत अपयशी ठरले आहे. आता जेव्हा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे कोणतीही योजना नाही, तेव्हा आघाडी सरकारने त्यांच्या नैतिक जबाबदारीपासून दूर पळत केंद्र सरकार वर दोषारोप सुरू केले आहेत, असा आरोप दानवे यांनी केला.
केंद्राने सर्व राज्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी १६२ प्रेशर स्विंग एडसोर्पशन (पीएसए) ऑक्सिजन प्लांटच्या इंस्टॉलेशनची मंजुरी जानेवारी २०२१ ला दिली होती. मंजूर केलेल्या १६२ प्लांट्समधून अशा १० प्लांट्सच्या इंस्टॉलेशनची मंजुरी केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिली होती. परंतु महाराष्ट्र सरकारने या दिशेने कोणतेही कठोर पाऊले उचलले नाहीत, असा दावा त्यांनी केला.
हेही वाचा:
राजेश टोपेंची तात्काळ हकालपट्टी करा- किरीट सोमय्या
रिलायन्सकडून मुंबईसाठी ८७५ नवे अद्ययावत बेड
मोफत लसीकरणासाठी ठाकरे सरकार पैशाचे सोंग कुठून आणणार?
जानेवारी २०२१ला प्लांट उभारण्यासाठी मंजुरी दिली असून या विषयावर युद्धपातळीवर जर काम केलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असती. इतकंच हा नाही तर, या संपूर्ण योजनेचा खर्च केंद्र सरकारच करणार आहे. त्यासोबत यामध्ये सात वर्षासाठी लागणारा देखभाल खर्च देखील केंद्र सरकार देणार आहे. पण महाराष्ट्र सरकारकडून असे काहीही झाले नाही व यातूनच महाविकास आघाडीचा निष्काळजीपणा व बेजवाबदारपणा यातून स्पष्टपणे दिसून येतो, असं त्यांनी सांगितलं.