देवेंद्र फडणवीसांची चौकशी सुरु

देवेंद्र फडणवीसांची चौकशी सुरु

महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी मुंबई पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. फडणवीसांनी उघड केलेल्या पोलीस बदली महाघोटाळ्याच्या संदर्भात त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी पोलीस दाखल झाले आहेत. बीकेसी सायबर पोलिस स्थानकाचे एसिपी नितीन जाधव, डीसीपी हेमराज सिंह आणि इतर अधिकारी फडणवीस यांचा जबाब नोंदवणार आहेत

शनिवार, १२ मार्च रोजी देवेंद्र फडणवीस यांना बीकेसी सायबर पोलिसांनी सीआरपीसी १६० अंतर्गत नोटीस बजावली होती. या नोटिशीच्या अनुषंगाने फडणवीस यांना चौकशीसाठी बीकेसी पोलीस स्थानकात बोलावण्यात आले होते फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत यासंबंधीची माहिती दिली. या वेळी आपण पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

हे ही वाचा:

भारतविरोधी जिहादसाठी केली जाणार होती मुस्लिम तरुणांची भर्ती

राज्यभर भाजपा आक्रमक; देवेंद्र फडणवीसांना पाठवलेल्या नोटिशीची होळी

सोनिया, राहुल, प्रियांका राजीनामा देणार?  बातमीने खळबळ

‘देवेंद्र फडणवीसांना पाठवलेल्या नोटिशीची करणार होळी’

त्यानंतर पोलिसांनी यांच्याशी संपर्क करत चौकशीसाठी त्यांनी पोलीस ठाण्यात येण्याची गरज नाही. पोलीस अधिकारी त्यांच्या निवासस्थानी येऊनच त्यांचा जबाब नोंदवतील असे त्यांना कळवले. फडणवीस यांनी ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली. त्यासाठी फडणवीस यांनी पुण्यातील त्यांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द केले आणि मी दिवसभर घरीच आहे. पोलिसांनी जेव्हा यायचंय तेव्हा यावे असे पोलिसांना सांगितले आहे.

सध्या सागर बंगल्यात डीसीपी हेमराज सिंह, नितीन जाधव फडणवीस यांची चौकशी करत आहेत. सागर बंगल्यातील एका खोलीत ही चौकशी सुरू आहे. तर यावेळी फडणवीस यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी भाजपाचे अनेक नेते सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. यामध्ये विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, प्रसाद लाड, नितेश राणे, अभिमन्यू पवार, कालिदास कोळंबकर या सर्वांचा समावेश आहे.

Exit mobile version