पावसाच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या कोकणाला सावरण्यासाठी अनेक हात पुढे येत आहेत. कोकणातली स्थिती पूर्ववत होईपर्यंत तेथील नागरिकांचे मोडलेले संसार पुन्हा उभे करण्यासाठी महाराष्ट्रभरातून मदत पाठवली जात आहे. भाजयुमोमार्फत कोकणला मदतीचा हात दिला जाणार आहे.
राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीकडूनही कोकणसाठी अन्न, वस्त्र, पाणी, औषधे अशा विविध गोष्टी पाठवल्या जात आहेत. अशाच प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंची मदत ही भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबई मार्फत पाठवण्यात आली आहे.
मंगळवार, २७ जुलै रोजी भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबई मार्फत कोकणासाठी मदतीचा पहिला ट्रक पाठवण्यात आला. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत हिरवा झेंडा दाखवून हा ट्रक रवाना करण्यात आला. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात भाजयुमो मुंबईने कोकणातील पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत कार्य सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून मदतीची पहिली खेप कोकणाकडे रवाना करण्यात आली. असे ९ ट्रक कोकणला पाठविण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
आता ‘हा’ भारतीय खेळाडू कोरोना पॉसिटीव्ह
मोदी सरकारच्या योजनेचा तृतीयपंथीयांना मिळणार ‘हा’ फायदा
रिलायन्सच्या नावाने ‘हा’ नवा विक्रम
राज्यपाल कोश्यारी आज पूरग्रस्तांना भेटणार
भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांच्या नेतृत्वात युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कोकणासाठी पाण्याच्या बाटल्या, बिस्किटांचे पुडे, चादरी, आवश्यक औषधे, सॅनिटरी पॅड्स अशा दैनंदिन आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी पाठवण्यात आल्या. या मदती सोबतच युवा मोर्चाचे कार्यकर्ते स्वतः पूरग्रस्त भागात जाऊन मदत कार्यात सहभाग घेत आहेत.
भाजयुमोचे अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांनी दिलेल्या माहितीनुसार मदत कार्याचा पहिल्या टप्प्यात भाजयुमोचे कार्यकर्ते कोकणातील एक हजार परिवारांसाठी आवश्यक मदत घेऊन जात आहेत. “कोकणातील पीडित नागरिकांना मदतीचा हात देण्याचा आमचा हा एक छोटा प्रयत्न आहे” असे तिवाना यांनी सांगितले.
कोकणातील पूरग्रस्तांसाठी "एक हात मदतीचा सामाजिक कर्तव्याचा" विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis यांच्या आवाहनाला साद देत भाजपा मुंबई अध्यक्ष @MPLodha यांच्या मार्गदर्शनात तसेच @BJYM4Mumbai अध्यक्ष @TajinderTiwana यांच्या नेतृत्वात भाजयुमो मुंबई तर्फे पूरग्रस्तांना मदत पाठवण्यात आली. pic.twitter.com/kjRyA64Tnt
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) July 27, 2021