शिवसेना भवनावर भाजपा युवा मोर्चाचा “फटकार मोर्चा”

शिवसेना भवनावर भाजपा युवा मोर्चाचा “फटकार मोर्चा”

मुंबई भाजपा युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपाने फटकार मोर्चा आयोजित केला आहे. भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येत आहे. मात्र शिवसेना आमदार सदा सरवणकर हे शिवसैनिकांसह सेनाभवन परिसरात दाखल झाल्याने, परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी या परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

अयोध्येत श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप करून शिवसेना उर्फ ​​सोनिया सेनेने हिंदू धर्म, हिंदू धार्मिक स्थळ आणि हिंदूंच्या श्रद्धा आणि आस्था यांचा अपमान केला आहे. भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईतर्फे शिवसेनेच्या या शुल्लक राजकीय षडयंत्रविरोधात “फटकार मोर्चा” आयोजित करण्यात आला आहे, हा तीव्र निषेध भाजपा शिवसेना भवन समोर करत आहे, असं भाजपा युवा मोर्चाने म्हटलं आहे.

राम मंदिरासाठी जगभरातून शेकडो कोटींचा निधी येत आहे. प्रभू रामचंद्राच्या नावानं एकही घोटाळा व्हायला नको. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये भाजपशी संबंधित सदस्य आहेत. शिवसेनेचा एकही सदस्य नाही. रामभक्तांच्या श्रद्धेला तडा जाईल असं काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशायस्पद प्रकरण समोर आलं आहे. ते खरं की खोटं याचा लगेच खुलासा झाला तर बरं. ट्रस्टनं याबाबत खुलासा करायला हवा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती.

हे ही वाचा :

मुंबई-पुण्यात ५जी च्या चाचणीला सुरवात

‘रामायणातील सुमंत’ काळाच्या पडद्याआड

उल्हासनगर महापालिकेचे स्थायी समिती सभापतीपद भाजपाकडे

हमेल्सच्या स्वयंगोलच्या जीवावर फ्रान्स शिलेदार

राममंदिराच्या धर्मकार्यात अडथळा आणणारी शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक आहे. काँग्रेस, शिवसेनेने केलेले आरोप बोगस होते, हे आता उघड झाले आहे. सत्तेसाठी काँग्रेस चरणचाटण खुशाल करा, पण रामकार्यात तंगडं घालाल तर गाठ आमच्याशी आहे, हे लक्षात ठेवा. असं ट्विट भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी केले आहे.

Exit mobile version