चंदीगढमध्ये ‘इंडी’गढ ढेपाळला, महापौरपद भाजपाकडे

भाजपाचे मनोज सोनकर महापौर पदी बसणार

चंदीगढमध्ये ‘इंडी’गढ ढेपाळला, महापौरपद भाजपाकडे

भारतीय जनता पक्षाला म्हणजेच भाजपाला टक्कर देण्यासाठी म्हणून विरोधकांनी ‘इंडी’ आघाडी उघडली आहे. मात्र, या आघाडीत काहीच आलबेल नसल्याचे वृत्त वारंवार समोर येत आहे. अशातच इंडी आघाडी आणि भाजपा हे पहिल्यांदाच चंदीगढच्या महापौर पदाच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या निवडणुकीच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत भाजपाने बाजी मारत ‘इंडी’ आघाडीला धोबीपछाड दिला आहे. भाजपाचे मनोज सोनकर हे आता महापौर पदी बसणार आहेत.

पंजाबमधील चंदीगढच्या महापौर पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी केली होती. ‘आप’कडून कुलदीप कुमार हे रिंगणात होते तर भाजपाकडून मनोज सोनकर उभे होते. त्यामुळे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात ‘इंडी’ आघाडी विरुद्ध भाजपा अशी थेट रंगली. या निवडणुकीत भाजपाचे महापौर पदाचे उमेदवार मनोज सोनकर यांना १६ तर ‘इंडी’ आघाडीच्या उमेदवाराला १२ मते पडली. ८ मते बाद ठरल्याने या निवडणुकीत भाजपाचा विजय झाला आहे. या विजयासह भाजपाने महापौर पदासाठी आपला आठ वर्षांचा दबदबा कायम ठेवला आहे.

बिहारमध्ये राजकीय पटलावर मोठे बदल झाले. नितीश कुमार यांच्या अनपेक्षित खेळीनंतर, लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीए आणि इंडी आघाडी यांच्यातील ही पहिली आमनेसामने होणारी लढाई होती. भाजपाला मात देण्यासाठी म्हणून आप आणि काँग्रेसने युती केली होती. मात्र, याचा फारसा फरक भाजपाला पडला नसल्याची चर्चा आहे.

हे ही वाचा:

राबडीदेवीच्या गोशाळेतील कामगाराला लाच म्हणून मिळाली मालमत्ता

‘अधीर रंजन म्हणजे काँग्रेसमधील छुपे शत्रू’

हेमंत सोरेन यांची पत्नी झारखंडच्या मुख्यमंत्री होतील!

आयएनएस सुमित्राने चाचेगिरीचा प्रयत्न हाणून पाडला; १९ पाकिस्तानी नागरिकांसह इराणी जहाजाला वाचविण्यात यश

दरम्यान, या निकालानंतर महापालिकेत मोठा राडा झाला. तसेच आम आदमी पार्टीने हे भाजपाचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. जाणीवपूर्वक ८ नगरसेवकांची मते बाद करुन भाजपाच्या उमेदवाराला अप्रत्यक्षपणे मदत केली असल्याचा दावा आपने केला आहे.

Exit mobile version