स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरण
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या नितीन राऊत यांच्याविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एफआयआर दाखल करण्याचा आदेश द्यावा. जोपर्यंत नितीन राऊत माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन सुरूच राहील असा इशारा मुंबई भाजपाचे प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.
महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या अश्लाघ्य पोस्टनंतर महाराष्ट्रात त्याविरोधात संतापाचे वातावरण आहे. भारतीय जनता पार्टीने त्यांच्या या पोस्टविरोधात आंदोलन करत राऊत यांच्या पोस्टरवर जोडे मारले. कांदिवली पूर्व मतदारसंघातील कार्यालयासमोर जोडे मारा आंदोलनातून राऊत यांच्या प्रती संताप व्यक्त करण्यात आला. सोशल मीडियावर यापुढे स्वातंत्र्यवीरांबद्दल अभद्र टिप्पणी करणाऱ्यांना यापुढे जोड्यानेच उत्तर देण्यात येईल, असे आमदार भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
भाजपाच्या दणक्याने नरमलेल्या @NitinRaut_INC यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणारी पोस्ट डिलीट केली, परंतु हे पुरेसे नाही.
त्यांनी तात्काळ दिलगिरी व्यक्त करावी अन्यथा मुख्यमंत्री @OfficeofUT यांनी त्यांच्यावर FIRकरण्याचा आदेश द्यावा. माफी नाही तोपर्यंत, आंदोलन सुरू राहील. pic.twitter.com/lwsB55kpCX— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 22, 2021
या आंदोलनानंतर राऊत यांनी आपली पोस्ट रद्द केली आहे. पण त्यानंतरही आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे की, भाजपाच्या दणक्याने नरमलेल्या नितीन राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणारी पोस्ट डिलीट केली आहे पण ते पुरेसे नाही. त्यांनी तात्काळ दिलगिरी व्यक्त करावी अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश द्यावेत. माफी नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील.
हे ही वाचा:
१०० कोटी लसीकरण हे नव्या भारताचे चित्र
योगी सरकारने १५१ गुन्हेगारांना ठोकले
भारताविरुद्ध चीनच आक्रमकाच्या भूमिकेत
‘शिवशाही’चं वचन देणा-यांनी ‘निजामशाही’ आणलीय’
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करून स्वतःची पाठ थोपटून घेण्याची काँग्रेस नेत्यांची वाईट खोड वेळोवेळी दिसली आहे. त्यात आता नितीन राऊत यांची भर पडली आहे. त्यावर सर्वसामान्य नागरिकांनी सोशल मीडियातून जोरदार प्रहार केले आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे ऊर्जामंत्री @NitinRaut_INC यांच्याविरोधात आज माझ्या कांदिवली पूर्व मतदारसंघातील कार्यालयासमोर 'जोडे मारा' आंदोलन केले. सोशल मीडियावर स्वातंत्र्यवीरांबद्दल अभद्र टिप्पणी करणाऱ्यांना यापुढे जोड्यानेच उत्तर. pic.twitter.com/1Ke4kr9cYE
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 22, 2021