कोल्हापूरात उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची जय्यत तयारी सुरु झाली आहे. आज भारतीय जनता पार्टीकडून सत्यजित कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना भाजपाकडून कोल्हापुरात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. शक्तीप्रदर्शनावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवडे, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे आणि अन्य भाजपा नेते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शनिवारी प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कदम यांची उमेदवारी जाहीर केली. सत्यजित कदम यांचा अर्ज दाखल करण्यासाठी भाजपाकडून कोल्हापुरातील दसरा चौकातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी, कोल्हापुर उत्तर पोटनिवडणूकीमध्ये भाजपा शंभर टक्के विजयी होणार असल्याचा दावा केला आहे.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री तथा गृहराज्य मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, फक्त उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी जाताना प्रचंड मोठ्या संख्येने लोक आले आहेत. त्यावरुन स्पष्ट होतं की, भाजपाच या पोटनिवडणुकीत विजयी होणार आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
हे ही वाचा:
हैदराबादमध्ये गोदामाला लागलेल्या आगीत ११ जण होरपळले
…आणि भारताने गाठले चार अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य
पाटणकर प्रकरणातल्या पुष्पक बुलियनने नोटाबंदीत केली २८५ किलो सोने खरेदी
कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे गेल्यावर्षी निधन झाले होते. या रिक्त जागेसाठी आता पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने जयश्री चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या रिक्त जागेसाठी १२ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.