ठाकरे सरकारने ओबीसींचा घात केला

ठाकरे सरकारने ओबीसींचा घात केला

ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचं राज्यभर तीव्र आंदोलन

“ओबीसी समाजाचा विश्वासघात करणाऱ्या महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात आज पुणे येथे भाजपाच्या वतीने ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आ.योगेश टिळेकर जी यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी होऊन सरकारचा जाहीर निषेध केला.” असं ट्विट करत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून आज भाजपाने संपूर्ण राज्यात एक हजार ठिकाणी जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचं आरक्षण गेल्याचा आरोप करत भाजपाने संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडला आहे. ठाण्यापासून मुंबई-पुण्यापर्यंत आणि नागपूरपासून औरंगाबादपर्यंत भाजपाचा एल्गार आज पाहायला मिळाला.

सोलापुरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. यावेळी पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटपट झाली. भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी पुतळा जाळण्याचा आवाहन केल्यानंतर कार्यकर्त्यांनी पुतळा जाळण्याचा प्रयत्न केल्यानंतर ही झटापट झाली.

औरंगाबाद शहरातील अमरप्रीत चौकात भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र जमून सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या. आमदार अतुल सावे आणि संजय केनेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हे ही वाचा:

गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या ‘या’ निर्णयाने लव्ह जिहादला बसणार फटका

कोरोनाची जन्मभूमी चीनमध्येच पुन्हा कोरोनाचे थैमान

आयफोन १३ लॉंच, काय आहेत नवीन फीचर्स?

दोन दिवसांत पेट्रोल डिझेलचे भाव अर्ध्यावर?

ठाण्यात भाजप आमदार निरंज डावखरे यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आले. हातात फलक घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात स्त्रियांचा मोठा सहभाग होता. आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

Exit mobile version