23 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरराजकारणसमृद्धी महामार्ग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा आक्रोश मोर्चा रद्द; ठाकरे गट मोर्चा काढण्यावर...

समृद्धी महामार्ग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा आक्रोश मोर्चा रद्द; ठाकरे गट मोर्चा काढण्यावर ठाम

मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी दिली माहिती

Google News Follow

Related

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाने संवेदनशील निर्णय घेत शनिवार, १ जुलै रोजी मुंबईत होणारे भाजपाचे ‘आक्रोश आंदोलन’ न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी याबाबत माहिती दिली.

आशिष शेलार म्हणाले की, “बुलढाण्यातील अत्यंत वेदना देणाऱ्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. दुःखाचा डोंगर कोसळेल्या कुटुंबासोबत आमच्याही सहवेदना आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत. तसेच मदतीचा हात दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घटनास्थळी पोहचले आहेत. आजचा दिवस दुःखाचा आहे, आज आम्ही काही बोलणार नाही, पण मुंबईकरांना लुटणाऱ्यांकडे हिशेब मात्र यापुढे ही मागतच राहू,” असं आशिष शेलार यांनी म्हटलं.

ठाकरे गट मोर्चा काढण्यावर ठाम

दरम्यान, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शनिवार, १ जुलै रोजी ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. भाजपाने आंदोलन स्थगित केले असले तरी ठाकरे गट मोर्चा काढण्याच्या निर्णयावर ठाम आहे. उद्धव ठाकरे हेही या मोर्चात सहभागी होणार आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाकडूनही मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पण, बुलढाणामधील भीषण बस अपघातानंतर भाजपाने मोर्चा रद्द केला आहे.

हे ही वाचा:

समृद्धी महामार्गावरील अपघातावर पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी ड्रायव्हर, क्लिनरला पोलिसांनी घेतले ताब्यात

नीरज चोप्राची पुन्हा अव्वल कामगिरी

कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी संजीव जयस्वाल यांची ईडीकडून १० तास चौकशी

बुलढाण्यात नेमकं काय घडलं?

खासगी प्रवासी बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने जात असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. बसने पेट घेतल्यामुळे बसमधील २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर, आठ जण जखमी आहेत. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती. बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि बसने पेट घेतला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा