राज्यभर भाजपा आक्रमक; देवेंद्र फडणवीसांना पाठवलेल्या नोटिशीची होळी

राज्यभर भाजपा आक्रमक; देवेंद्र फडणवीसांना पाठवलेल्या नोटिशीची होळी

विधान सभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी पाठवण्यात आलेल्या नोटिशीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात भाजपा कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटिशीची होळी करणार असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर रविवार १३ मार्च रोजी सकाळपासून भाजपा कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाला सुरुवात केली आहे.

रविवार सकाळपासून देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवास्थानी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानी स्वतः जाऊन त्यांचा जबाब नोंदवणार आहे. दरम्यान ‘सागर’ बंगल्याबाहेर भाजपा कार्यकर्ते जमू लागले आहेत.

भाजपा आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणावर ठाकरे सरकारला टोला लागावला आहे. “राज्य सरकारचं आमच्यावर प्रेम आहे. सकाळी गुड मॉर्निंगच्या मेसेजप्रमाणे हल्ली आम्हाला नोटिसा येतात,” असा टोला नितेश राणे यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. भाजपा आमदार कालिदास कोळंबकर, नितेश राणे, प्रसाद लाड हे सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत.

हे ही वाचा:

भारतविरोधी जिहादसाठी केली जाणार होती मुस्लिम तरुणांची भर्ती

मविआ सरकार बॅकफूटवर; फडणवीसांच्या घरी जाऊन नोंदवणार जबाब

सोनिया, राहुल, प्रियांका राजीनामा देणार?  बातमीने खळबळ

‘देवेंद्र फडणवीसांना पाठवलेल्या नोटिशीची करणार होळी’

पुणे, चंद्रपूर, नागपूर, सांगली आदी ठिकाणी भाजपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. पुण्यात देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटिशीची होळी करण्यात आली असून राज्यभरात अशीच भाजपाकडून नोटिशीची होळी करण्यात येणार आहे. दरम्यान शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण पोलिसांना सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते.

Exit mobile version