भारतीय जनता पार्टीने मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचार बाहेर काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. पोलखोल अभियानातून भाजपा भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. या पोलखोल मोहिमेची सभा १ मे रोजी मुंबईत होणार आहे अशी माहिती आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे. तसेच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारची पोलखोल करणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.
शेलार म्हणाले, १ मे रोजी भाजपाची मुंबईत पोलखोल सभा होणार आहे. या सभेत देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीची पोलखोल करणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचे या सभेकडे लक्ष लागले आहे. मविआचे भ्रष्टाचार बाहेर पडणार या भीतीने त्यांनी तोडफोड करण्यास सुरवात केली आहे. मात्र आम्ही संघर्ष करणार असल्याचे शेलार यांनी सांगितले आहे.
पुढे ते म्हणाले, पोलखोल अभियान अंतर्गत अनेक सभा आमच्या होत आहेत. याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यामुळे शिवसेना अस्वस्थ होत असून, आमच्या पोलखोल अभियानावर हल्ले करत आहेत. पोलखोल अभियानाचा रथ आणि स्टेज शिवसेना कार्यकत्यांनी तोडले. शिवसेना सध्या गुंडगिरी करत असल्याचे शेलार म्हणाले.
हे ही वाचा:
योगींच्या आदेशावरून ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवले
“कुख्यात युसुफ लकडावाला प्रकरणी पवारांची चौकशी होणार काय?”
‘संजय राऊत लकडावाला यांच्या रिसॉर्टमध्ये राहायचे’
कराची विद्यापीठात स्फोट करणारी महिला दोन मुलांची आई
१७ एप्रिल पासून भाजपाने मुंबईत पोलखोल अभियान सुरु केले आहे. या अभियानाचे मध्यमातून मुंबई महापालिकेत झालेला भ्रष्टाचार आणि शिवसेना नेत्यानावर होणारी कारवाई याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम भाजपा करत आहे. दरम्यान, १ मे रोजी महाराष्ट्र दिनी देवेंद्र फडणवीस जाहीर सभादेखील घेणार आहेत.