पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि फोडाफोडीच्या राजकारणाविरोधात भाजपाचे राज्यपालांकडे निवेदन

पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि फोडाफोडीच्या राजकारणाविरोधात भाजपाचे राज्यपालांकडे निवेदन

Source: ANI

पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारींच्या नेतृत्वाखाली भाजपाचे आमदार आज राज्यपालांना भेटले. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंविरोधात आणि विशेषतः भाजपा कार्यकर्त्यांविरोधात होत असलेल्या अत्याचाराविरोधात कारवाई करण्याचे निवेदन सादर केले.

पश्चिम बंगालमध्ये मतदानानंतर झालेल्या हिंसाचारात तृणमूल काँग्रेस (टीएमसी) कार्यकर्त्यांकडून भाजपा कार्यकर्त्यांचा खून करण्यात आला. घडलेली घटना सांगण्यासाठी पुढे आलेल्या महिलांवर सत्ताधारी पक्षाकडून सामुहिक बलात्कार करण्यात आला. हा अतिशय भयानक असा प्रकार असून या सर्व घटनेची चौकशी आता एसआयटीच्या अंतर्गत केली जावी, अशी मागणी करण्यात येत आहे. भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांच्या खुनानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याची दखल घेतल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून बलात्कार झालेल्या महिलादेखील पुढे आल्या आहेत. आता पोलिसांची निष्क्रीयता आणि घडलेल्या हिसांचाराची चौकशी एसआयटी अंतर्गत होईल.

गोध्रा नंतरच्या जातीय दंगली प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या या कारवाईमुळे या महिलांना सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे. त्यामुळेच टीएमसीच्या विजयानंतर राज्यात पंधरवडाभरात झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनांच्या न्यायालयीन देखरेखीखाली एसआयटी चौकशीची मागणी आता करण्यात आलेली आहे.

हे ही वाचा:

लपवलेले मृतांचे आकडे हळूहळू येऊ लागले बाहेर

शेकडो वर्षांची परंपरा मोडण्याचं पाप करू नका

मूकबधिर चोराला बोलतं करण्यासाठी वापरली ही शक्कल

जेव्हा देशाचे पंतप्रधान मोदींनी प्रत्यक्ष मदत केली होती…

विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या घोषणेनंतर टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने अराजकता माजवली त्याला काहीच तोड नाही.६० वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिच्यावर सामूहिक बलात्काराची घटना यावेळी घडली होती. अतिशय हिंस्त्र पद्धतीने कार्यकर्ते यावेळी वागले होते. केवळ इतकेच नाही तर या महिलेच्या सहा वर्षांच्या नातवासमोर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार या महिलेने कथन केला.

Exit mobile version