ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मठीकाणाबद्दल चुकीचे व्यक्तव्य केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरु झाले. याप्रकरणी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी भाजपाने मुंबईमध्ये ‘माफी मांगो’ आंदोलनाची हाक दिली आहे.
आशिष शेलार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला यावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जात आहे. त्यामुळे खासदार संजय राऊत यांना आंबेडकरांची दोन पुस्तकं भेट दिली आहे, राऊतांनी ती वाचावी आणि इतिहास समजून घ्यावा. खोटी माहिती पसरवणे ही अक्षम्य चूक असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
पुढे आशिष शेलार म्हणाले, संजय राऊत अज्ञान पाजळण्याची एकही संधी सोडत नाहीत. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं ते तरी उद्धवजींच्या सेनेला मान्य आहे का? असा सवालही शेलारांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांना सामनामध्ये जे काही मिळालं ते उद्धवजींमुळे मिळालं आहे. एवढं होऊनही त्यांनी साधी माफी मागायची तसदी घेतली नाही. ज्या बाबासाहेबांना काँग्रेसने पाडलं त्याचं काँग्रेसबरोबर उद्धव ठाकरे गेले, असंही शेलार यांनी म्हटले आहे.
यावेळी आशिष शेलार यांनी सुषमा अंधारे यांच्यावरही निशाणा साधला आहे. परवाच्या ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचीही वक्तव्य समोर येत आहेत. त्यात त्या हिंदु देवदेवता आणि संताची चेष्ठा तसेच अपमान करताना दिसतं आहे. हा महाराष्ट्राचा द्रोह नाही का? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे कधी मौन सोडणार असाही प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा :
ठाकरे गटाला नाशिकमध्ये खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
अखेर कोळी बांधवांची मागणी मुख्यमंत्र्यांनीचं पूर्ण केली
पाकिस्तानी पत्रकाराला एस जयशंकर यांनी फटकारलं
‘गांधी-गोडसे एक युद्ध’ मधून राजकुमार संतोषी काय सांगणार?
त्यांच्या या बेताल वक्तव्यामुळेचं शनिवार, १७ डिसेंबर रोजी भाजपाचा मुंबईमध्ये माफी मांगो मोर्चा निघणार आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले माफी मागा, अशी मागणी मोर्चामधून भाजपा करणार असल्याचे शेलार म्हणाले आहेत. काळे झेंडे दाखवत महाविकास आघाडीचा निषेध करण्यात येणार असल्याचं शेलार यांनी सांगितले आहे.