हसन मुश्रीफ यांच्या नावात प्रभू श्रीरामांचे नाव पोस्टरमध्ये घेतल्यामुळे कोल्हापुरात नव्या वादाला सुरवात झाली आहे. हा संपूर्ण प्रकार निंदनीय असल्याचे सांगत भारतीय जनता पार्टीचे नेते समरजीतसिंघ घाटगे यांनी आक्षेप नोंदवला आहे. आज, १५ एप्रिल रोजी घाटके यांनी कागलमध्ये मुश्रिफांविरोधात मोर्चा काढत तक्रारीसाठी कागल पोलीस ठाणे गाठले आहे.
मुश्रीफांच्या घराबाहेर समर्थकांनी गर्दी केली असून, मुश्रिफांविरोधात घोषणाबाजी करत आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास घाटके मोर्चा घेऊन पोलीस ठाण्यात गेले होते मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला आहे. घाटगे पुरावे घेऊन गेले असताना सुद्धा पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
मुश्रीफांना आता जनताच सडेतोड उत्तर देईल. ४० वर्ष हसन मुश्रीफ हे जनतेशी खोट बोलत आले आहेत, माझ्याकडे पुरावे आहेत त्यांचा वाढदिवस नेमका कधी येतो. रामनवमीच्या दिवशी मुश्रीम जन्मला आले हे साफ खोटे आहे. मुश्रीम हे राजकरणात खंजीर घेऊनच जन्माला आले आहेत. पोलीस ठाण्यात याबाबत सर्व पुरावे घेऊन गेलो असतानाही पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याचे घाटकेंनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
एसटी कर्मचारी आत्महत्या प्रकरणी सुओ मोटो खटला भरा!
कर्करोगग्रस्त रुग्णांचा कुटुंबीयांसाठी ‘बाबू आर.एन. सिंह अतिथीगृह’
शांघायमध्ये लॉकडाऊनमुळे होतेय लोकांची उपासमार
एसटी कर्मचारी आत्महत्या प्रकरणी सुओ मोटो खटला भरा!
दरम्यान, १० एप्रिलला रामनवमी होती आणि याच दिवशी हसन मुश्रीम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी, वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या निमित्ताने कोल्हापूर दूध उत्पादक संघाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पोस्टरवर हसन मुश्रीफ यांचे नाव श्रीरामांसोबत जोडले होते. यावरून भाजपा नेते समरजीत घाटगे यांनी त्यांच्यावर टीका केली होती आणि तक्रार दाखल करण्याचे सांगितले होते. हसन मुश्रीफ स्वत: ला रामाच्या बरोबर समजू लागले आहे का? असा सवाल घाटगे यांनी उपस्थित केला आहे.