भाजपाची गीतापठणाची मागणी; सपाचा विरोध

भाजपाची गीतापठणाची मागणी; सपाचा विरोध

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये भगवत गीता पठण केले जावे अशाप्रकारची मागणी भाजपने केली आहे. मात्र भाजपच्या या मागणीला समाजवादी पक्षाने विरोध केला आहे. त्यामुळे गीता पठणाच्या मुद्द्यावरून महापालिकेत भाजप आणि समाजवादी पार्टी आमनेसामने येण्याची चिन्हे दिसत आहेत.

भाजपच्या नगरसेविका योगिता कोळी यांनी ही मागणी केली असून त्यांनी ठरावाच्या सूचनेचे निवेदन महापौर किशोरी पेडणेकर यांना सादर केले. त्यावर समाजवादी पक्षाचे गटनेते आणि आमदार रईस शेख यांनी महापौरांना पत्र पाठवून ही ठरावाची सूचना रद्द करण्याची मागणी केली आहे.

योगिता कोळींची मागणी काय आहे?

भगवत्‌ गीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते. सामान्य जनांमध्ये भगवत्-गीता, ‘गीता’ या नावाने ओळखली जाते. हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे या गीतेचे स्वरूप आहे.
त्यामुळे मुंबई महापालिकेच्या शाळांमधून भगवत गीता पठण केले जावे. जेणेकरून भावी पिढीवर योग्यप्रकारचे संस्कार होतील, असे भाजपच्या नगरसेविका योगिता कोळी यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. ठरावाच्या सुचनेचे महापौरांना सादर करण्यात आल्यानंतर भाजपचे पक्षनेते विनोद मिश्रा, कमलेश यादव यांच्यासह कोळी यांनी भगवत गीता महापौर किशोरी पेडणेकर यांना भेट दिली आहे.

हे ही वाचा:

शपथपत्रात खोटी माहिती दिल्याबद्दल अब्दुल सत्तार यांची चौकशी

संजय राऊत पुन्हा सोमय्यांवर घसरले

‘पुण्यात घडले ते रायगडमध्येही घडेल’! शिवसेना आमदारांचा सोमैय्यांना धमकीवजा इशारा

सुधीर जोशींवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

या ठरावाच्या सूचनेची दखल समाजवादी पक्षाने घेतली असून पक्षाचे महापालिका गटनेते व आमदार रईस शेख यांनी शाळांमधून भगवत गीता पठण करण्याबाबतची जी ठरावाची सूचना मांडण्यात आली आहे, ती सूचना रद्द करण्याची मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे . त्यामुळे आता सर्वांचे लक्ष महापौरांच्या निर्णयाकडे लागून राहिले आहे.

Exit mobile version