ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने चक्का जाम आंदोलन पुकारले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन महाराष्ट्रभर पेटले आहे. महाराष्ट्रातील १००० ठिकाणी हे आंदोलन घेण्यात येत आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी आंदोलन करून ओबीसी समजाला न्याय मिळाला पाहिजे अशी हाक या आंदोलनाच्या माध्यमातून भाजपा कार्यकर्त्यांनी दिली आहे.
सकाळीच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात भाजपाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी जमले आणि त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविला. हातात पोस्टर्स, बॅनर्स घेऊन महिला, पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते.
हे ही वाचा:
अनिल देशमुख ११ वाजता पोहोचणार ईडी कार्यालयात
करावे तसे भरावे…नारायण राणे बरसले
कोरोनाचे ‘महाराष्ट्र मॉडेल’ जोडे मारण्याच्या लायकीचे!
महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण गमवावे लागल्याचा आरोप करण्यात येत होता. त्याच मुद्द्यावर भाजपाने हे आंदोलन हाती घेतले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर, पंढरपूर अशा शहरांत भाजपा कार्यकर्त्यांनी सकाळीच एकत्र येत निषेधाच्या घोषणा दिल्या. काहीठिकाणी पोलिस आणि आंदोलक यांच्यात झटापट झाल्याचाही प्रकार घडला. ठाण्यातील आंदोलनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि आंदोलकांना हटविले. या आंदोलनात महिलांची संख्याही विलक्षण होती. पंढरपुरात वाद्य आणि नृत्यासह आंदोलकांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्ग आयोग स्थापन करण्यास आणि इम्पिरिकल डेटा तयार करण्यास सांगितले होते. पण महाविकास आघाडीन त्यास विलंब लावला त्यामुळे अखेर राजकीय आरक्षण संपुष्टात आले. महाराष्ट्रातील ओबीसी समाज या निर्णयामुळे निराश झाला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत घेता येणार नाहीत, असे ठाकरे सरकारमधील मंत्र्यांकडून सांगण्यात येत होते. म्हणूनच निष्काळजी सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी भाजपाने हे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.