काल ९ मार्च रोजी आसाममध्ये नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालानुसार आसाममध्ये भारतीय जनता पार्टी ने मोठा विजय नोंदवला आहे. आसाम महानगरपालिकेच्या ८० जागांपैकी ७४ नगरपरिषदांमध्ये भाजपाने विजय नोंदवला आहे. तर काँग्रेसला केवळ एक नगरपालिका मंडळ मिळाले आहे.
त्याचवेळी भाजपाचा मित्रपक्ष आसाम गणपरिषदेने बारपेटा आणि बोकाखत या दोन नगरपालिका मंडळांवर कब्जा केला असून हैलाकांडी आणि मारियानी या दोन मंडळांवर अपक्षांनी कब्जा केला आहे. आसाममध्ये आम आदमी पक्षानेही खाते उघडले असून, दोन प्रभागात ‘आप’ निवडून आले आहेत.
आसाममध्ये ८० नगरपालिका मंडळांच्या ९२० प्रभागांसाठी मतदान झाले. तर ५७ प्रभागातील उमेदवार बिनविरोध घोषित झाले आहेत. या नगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण २ हजार ५३२ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये एकूण ९७७ नगरसेवक निवडून येणार होते, त्यापैकी ८०७ नगरसेवक हे भाजपाचे निवडून आले आहेत. भाजपाचे ८२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते, तर काँग्रेसच्या तिकिटावर किमान ७०६ उमेदवार उभे होते आणि आसाम गण परिषदेचे २४३ उमेदवार रीगणात होते.
हे ही वाचा:
काँग्रेसचे पुन्हा पानिपत! राहुल पाठोपाठ प्रियांकाही नापास
राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषीला जामीन मंजूर
भाजपा सपा मध्ये लागली ही अनोखी पैज
पाच राज्यात मतमोजणी सुरु! चार राज्यात भाजपा, पंजाबमध्ये आप
आसाम महानगरपालिका निवडणुकीत एकूण १६ लाख ७३ हजार ८९९ मतदारांची नोंद होती. ज्यात ८ लाख ४१ हजार ५३४ महिला होत्या. आसाम नगरपालिका निवडणुकीत ७० टक्के मतदान झाले. आसाम राज्यात शांततेत मतदान झाले. आसाम महापालिका निवडणुकीत २०२२ मध्ये प्रथमच ईव्हीएमचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे निकाल लागण्यास वेळ लागला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाजपच्या विजयाबद्दल अभिनंदन करत हा विकासाचा विजय असल्याचे म्हटले आहे.