पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी मतदारांना सर्व यूपी, बिहार आणि दिल्ली च्या ‘भैय्या’ला दूर ठेवण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसचा काळा चेहरा हळूहळू समोर येत आहे. या देशात कुणी जातीधर्माचा पुरस्कार केला तर काँग्रेसने केला. काँग्रेसने कधीही देशाला एकत्र आणण्याची भाषा केली नाही किंवा त्यासंबंधीच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्नही केला नाही. हे पुन्हा एकदा घडत आहे. यूपी आणि बिहारच्या भावाला पंजाबमध्ये येऊ देऊ नका, असे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी म्हटले आहे.
पंजाबमधील रुपनगर येथे एका निवडणूक सभेत मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी यूपी आणि बिहारच्या जनतेविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, जेव्हा त्यांनी ही टिप्पणी केली तेव्हा काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी त्यांच्या बाजूला उभ्या राहून हसत हसत त्यांचे कौतुक करताना दिसल्या आहेत.
मंच से पंजाब के मुख्यमंत्री यूपी, बिहार वालों को अपमानित करते हैं और प्रियंका वाड्रा बगल में खड़े हो कर हंस रही है, तालियाँ बजा रही हैं…
ऐसे करेगी कांग्रेस यूपी और देश का विकास? लोगों को आपस में लड़ा कर? pic.twitter.com/h6TtmvqgZQ
— Amit Malviya (@amitmalviya) February 16, 2022
यावर आता भाजपने आणि आम आदमी पक्षाने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपने म्हटले आहे की, प्रियंका गांधी यांनी काँग्रेस निवडणूक लढवत असलेल्या उत्तर प्रदेशातील जनतेचा अपमान केला आहे. त्याशिवाय भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही सीएम चन्नी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांच्या ट्विटर हँडलवर केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, पंजाबचे मुख्यमंत्री मंचावरून यूपी, बिहारच्या लोकांचा अपमान करतात आणि प्रियांका वड्रा त्यांच्या शेजारी उभ्या राहून हसत आहेत. टाळ्या वाजत आहेत. अशी काँग्रेस देशाचा आणि यूपीचा विकास करणार का?, असा प्रश्न त्यांनी केला आहे.
हे ही वाचा:
नवाब मलिक लावणार चांदीवाल आयोगासमोर हजेरी
३ हजार कोटींच्या शिक्षण अर्थसंकल्पात मराठी शाळांसाठी ‘शून्य’
पाकिस्तानी पत्रकारावर आयबी अधिकाऱ्यांचा हल्ला
अवघ्या सोळाव्या वर्षी गुजरातच्या बॅडमिंटनपटू तस्मिनने रचला इतिहास
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही चन्नी यांच्या कथित वक्तव्याचा निषेध केला. ते म्हणाले, “हे खूप लज्जास्पद आहे. आम्ही कोणत्याही व्यक्ती किंवा विशिष्ट समुदायाला उद्देशून केलेल्या टिप्पण्यांचा तीव्र निषेध करतो. प्रियांका गांधी याही यूपीच्याच आहेत.
चरणजीत सिंह चन्नी हे पंजाब निवडणुकीत काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे अधिकृत उमेदवार आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला पक्षाने केलेल्या सर्वेक्षणानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांची मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यापेक्षा जास्त मते मिळवली, जे स्वतःला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यासाठी बराच काळ दबाव टाकत होते.