केंद्रशासित प्रदेश दीवमध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. दीवमध्ये तब्बल पंधरा वर्षांनंतर भारतीय जनता पार्टीने सर्व जागा जिंकल्या आहेत. दीवच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच राजकीय पक्षाने सर्व जागा जिंकल्या आहेत. यापूर्वी दीवमध्ये काँग्रेसची सत्ता होती. दीव नगरपालिकेत पंधरा वर्षांनंतर भाजपाची सत्ता आली आहे.
भाजपाने दीवमध्ये तेरा पैकी तेरा जागा जिंकल्या आहेत. तेरा पैकी सहा जागा भाजपाने बिनविरोधी जिंकल्या आहेत. उरलेल्या जागांसाठी ७ जुलै रोजी मतदान पार पडले होते, ज्याचा निकाल शनिवार, ९ जुलै रोजी म्हणजेच आज लागला आहे. निकालात भाजपाने सातही जागा जिंकल्या आहेत.
हे ही वाचा:
डॅशिंग IRS अधिकारी समीर वानखेडे यांचा सन्मान
एलन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्सचा ट्विटर खरेदी करार केला रद्द!
गीता गोपीनाथ ‘आयएमएफ’च्या भिंतीवर झळकलेल्या पहिल्या महिला अर्थशास्त्रज्ञ
शिंदे- फडणवीस सरकारकडून मराठा समाजासाठी ३० कोटींचा जीआर
दीव भाजपाचे अध्यक्ष दीपेश तांडेल, राष्ट्रीय सचिव व प्रदेश प्रभारी विजय रहाटकर, खासदार लालू पटेल, निवडणूक प्रभारी विशाल दंडाळ, जिग्नेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली. निवडून आलेल्या तेरा उमेदवारांपैकी सात महिला आहेत, तर नऊ उमेदवार ४५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. दरम्यान, दीव महापालिका निवडणुकीने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, लोकांमध्ये भाजपाची स्वीकारार्हता सातत्याने वाढत चालली आहे.