दिल्लीमधील चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा गोंधळ झाला होता. यानंतर आम आदमी पक्षाचा उमेदवार महापौरपदी निवडून आला. यानंतर आता भाजपने उपमहापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. ही निवडणुकही काँग्रेस- आम आदमी पार्टी आणि भाजपा अशी थेट निवडणूक होती.
या निवडणुकीत वरिष्ठ उपमहापौरपदासाठी इंडिया आघाडीचे नगरसेवक गुरप्रीत सिंह गाबी आणि भाजपाचे नगरसेवक कुलजीत सिंह संधू यांच्यामध्ये निवडणूक झाली. तर उपमहापौरपदासाठी इंडियाच्या निर्मला देवी आणि भाजपाचे नगरसेवक राजिंदर शर्मा यांच्यामध्ये निवडणूक झाली. वरिष्ठ उपमहापौरपदाच्या निवडणुकीत आप आणि काँग्रेसच्या आघाडीचं एक मत रद्द झालं. तर या निवडणुकीत भाजपला १९ मतं आणि आघाडीला १६ मत मिळाली. तर एक मत रद्द झालं.
निवडणुकीत खासदार किरण खेर यांनी पहिल्यांदा मत टाकलं. त्यांनी मतदान करण्यापूर्वी नगरसेवक सौरभ जोशी त्यांच्याजवळ आले होते, त्यामुळे सभागृहात काही काळ गोंधळ झाला. यावेळी आप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी आरोप केला की कोणताही नगरसेवक मतदानापूर्वी आपल्या जागेवरुन उठून मतदान करणाऱ्या व्यक्तीजवळ जाऊ शकत नाही. पण यानंतर महापौरांनी समजावल्यानंतर प्रकरण शांत झालं.
हे ही वाचा:
मतदानासाठी लाच घेणाऱ्या खासदार, आमदारांवर कारवाई होणार
१० लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी छत्तीसगडमध्ये ठार, जवानही हुतात्मा!
भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रोसेवेचे उद्घाटन मोदी करणार
शाहबाज शरीफ यांचा आळवला काश्मीर राग!
यापूर्वी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत चंदीगडमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या मतमोजणीत आपची आठ मते अवैध ठरवण्यात आली होती. परंतु, नंतर ही मते वैध ठरवून चंदीगडच्या महापौर पदी आपचा उमेदवार घोषित करण्यात आला. पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांनी दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. चंदीगड महापौर निवडणुकीमध्ये मतामंध्ये फेरफार केलेल्या निवडणूक अधिकाऱ्याला सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं देखील होते. त्यामुळे बाद करण्यात आलेल्या आठ मतपत्रिकांसह पुन्हा मतमोजणी घेण्यात आली आणि आप पक्षाचा उमेदवार विजयी घोषित करण्यात आला.