वेल डन! भाजपला ७ पैकी ४ जागा

वेल डन! भाजपला ७ पैकी ४ जागा

देशातील सहा राज्यांतील विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला आहे. यामध्ये भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. भाजपाने सात पैकी चार जागांवर विजयाचा गुलाल उधळला आहे.

सहा राज्यांतील विधानसभेच्या सात जागांसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, हरियाणा, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांमध्ये सात जागांसाठी मतदान झाले होते. बिहारमधील दोन आणि इतर पाच राज्यांतील प्रत्येकी एका जागेवर पोटनिवडणूक झाली. भाजपाला तेलंगणामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. तसेच बिहारमधील दोन जागांपैकी एक जागा भाजपाला आणि दुसरी राष्ट्रीय जनता दलाला मिळाली आहे. उत्तर प्रदेशच्या गोला गाकर्णनाथ, बिहारच्या गोपालगंज, हरियाणातील आदमपूर आणि ओडिशातील धामनगर याठिकाणी भाजपाने विजय मिळवला आहे.
तेलंगणातील मुनुगोडे येथे टीआरएसचा विजय झाला आहे.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, बिहारच्या गोपालगंज जागेवर भाजपा उमेदवार कुसुम देवी यांनी राजदच्या मोहन गुप्ता यांचा एक हजार ७८९ मतांनी पराभव केला. बिहारच्या मोकामा जागेवर, आरजेडी उमेदवार आणि बाहुबली अनंत सिंह यांच्या पत्नी नीलम देवी यांनी भाजप उमेदवार सोनम देवी यांचा १७ हजार ७ मतांनी पराभव केला. त्याचवेळी उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्ह्यातील गोला गोकरनाथ मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार अमन गिरी यांनी सपाचे विनय तिवारी यांचा ३४ हजार २९८ मतांनी पराभव केला.

हे ही वाचा:

‘अजित पवारांची कुणालाही गॅरेंटी नाही’

‘मराठी मुस्लिम संकल्पनेचा प्रचार करणारे तोतया’

एका लग्नाची पुढची गोष्टचा १२,५०० वा प्रयोग, राज-फडणवीस उपस्थित राहणार

दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांना राष्ट्रवादीकडून ती मदत अद्याप नाही, पत्नीने केली विनंती

हरियाणाच्या आदमपूर मतदारसंघातून भाजपाचा तरुण चेहरा भव्या बिश्नोई यांनी काँग्रेसचे उमेदवार जयप्रकाश यांचा १५ हजार ७१४ मतांनी पराभव केला. या पोटनिवडणुकीत २२ उमेदवार रिंगणात होते. भाजपाच्या विजयानंतर केवळ काँग्रेसच्या उमेदवारांना त्यांचे डिपॉझिट वाचवण्यात यश आले तर उर्वरित २० उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. याशिवाय ओडिशाच्या धामनगर विधानसभा जागेवर भाजपाचे उमेदवार सूर्यवंशी सूरज यांनी त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्धी बीजेडी उमेदवार अवंती दास यांचा ९ हजार ८०२ मतांनी पराभव केला.

Exit mobile version