गोवा राज्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात ७ पैकी ६ नगरपालिकांत भाजपाला घवघवीत यश प्राप्त झाले आहे.
गोव्यात एकूण १३ नगरपालिका आहेत. यापैकी ७ नगरपालिकांच्या निवडणुका होणार होत्या. कोविड-१९च्या सर्व नियमांचे पालन करून या निवणडणुका घेण्यात आल्या. दिनांक २२ मार्च रोजी या सर्व मतदानाची मतमोजणी पार पडली. यात ७ पैकी ६ नगरपालिकांवर भाजपाने विजय प्राप्त केल्याचे समोर आले आहे.
पणजीमध्ये ३० वॉर्डपैकी २५ वॉर्डमध्ये भाजपा जिंकून आले, तर वालोपी आणि काणकोण याठिकाणी सर्वच्या सर्व वॉर्डवर भाजपाचा झेंडा फडकला. वालोपीमध्ये १० पैकी १० वॉर्डमध्ये भाजपा विजयी झाले तर काणकोणच्या १२ पैकी १२ ही वॉर्डात भाजपाच्या बाजूने निकाल लागला.
हे ही वाचा:
सचिन वाझेची ‘ती’ डायरी एनआयएच्या हाती
फोन टॅपिंगमुळे उघड झाला पोलिसांच्या बदल्यांचा धंदा
अनिल देशमुखांची लवकरच गृहमंत्री पदावरून हकालपट्टी?
याबाबत महाराष्ट्रातील भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करून सर्व मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. भातखळकर यांनी, ‘गोव्याच्या ७ पैकी ६ नगरपालिकेत भाजपने निर्विवाद बहुमत सिद्ध केले असून काणकोण नगरपालिकेत तर शत प्रतिशत भाजपचा झेंडा रोवला आहे. भाजपवर विश्वास दाखवणाऱ्या मतदारांचे आभार व कार्यकर्त्यांचे अभिनंदन’, असे ट्वीट केले आहे
गोव्याच्या ७ पैकी ६ नगरपालिकेत भाजपने निर्विवाद बहुमत सिद्ध केले असून काणकोण नगरपालिकेत तर शत प्रतिशत भाजपचा झेंडा रोवला आहे. भाजपवर विश्वास दाखवणाऱ्या मतदारांचे आभार व कार्यकर्त्यांचे अभिनंदन 🙏🙏🌷🌷 pic.twitter.com/w2daPexfNo
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 23, 2021