आसाम मधील गुवाहाटी महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मोठा विजय मिळवला आहे. भाजपा आणि मित्रपक्षांनी गुवाहाटी येथील निवडणुकीत ६० पैकी ५८ प्रभाग जिंकले आहेत. भाजपाच्या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुवाहाटीतील भाजपा उमेदवारांचे अभिनंदन केले तसेच गुवाहाटीतील जनतेचे आभार मानला आहे.
तब्बल नऊ वर्षानंतर गुवाहाटी येथे निवडूक लागली होती यामध्ये भाजपाच प्रचंड मतांनी विजयी झाले आहे. यामध्ये भाजपाने ६० पैकी ५८ जागा जिंकल्या आहेत. भाजपाचे तीन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. त्यातील उरलेल्या २ पैकी एक जागा आम आदमी पक्षाने तर असम राष्ट्रीय परिषदेने एक जागा जिंकली आहे. तर काँग्रेसला त्यांचे गुवाहाटी महापालिकेत खातेही उघडता आलेली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या विजयाबद्दल भाजप उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘विकासाचा अजेंडा तयार करण्यासाठी भाजपाला जबरदस्त जनादेश गुवाहाटीच्या जनतेने दिला आहे. गुवाहाटी महानगरपालिका निवडणुकीत शुक्रवारी सुमारे आठ लाख मतदारांपैकी ५३ टक्के मतदारांनी मतदान केले आहे.
हे ही वाचा:
‘मन की बात’ मधून पंतप्रधानांनी विचारले ‘हे’ सात प्रश्न
कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच मोदी काश्मीरमध्ये
राणा दाम्पत्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही सर्वांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, भाजपा आणि मित्रपक्षांना ५८ जागा मिळवून देण्यासाठी मी गुवाहाटीच्या जनतेसमोर नतमस्तक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली मिळालेला हा विजय म्हणजे विकासाचा नवा विश्वास असल्याचे सरमा म्हणाले.