देवभूमी उत्तराखंडने विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक निकाल दिला आहे. उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा नागरिकांनी कौल दिला असून भाजपा सत्ता स्थापन करताना दिसत आहे. उत्तराखंडमध्ये भाजपा सलग दुसऱ्यांदा सत्तेत येताना दिसत आहे. उत्तराखंड राज्याचा आजवरचा इतिहास बघता भाजपच्या या विजयाचे वेगळे महत्व आहे.
उत्तराखंड राज्याचा राजकीय इतिहास बघता उत्तराखंडमध्ये कधीच कोणता पक्ष सलग दोन वेळा सत्तेत येत नाही. पण हा इतिहास आता बदलला गेला आहे. २०१७ साली भाजपाने उत्तराखंडचे सत्ता काबीज केली होती. त्यानंतर आता २०२२ मध्ये भाजपाने पुन्हा एकदा उत्तराखंड राज्याची सत्ता हातात घेतली आहे. या विजयात जवळपास दोन तृतीयांश बहुमत भाजपाला मिळताना दिसत आहे.
हे ही वाचा:
शिवसेनेच्या हाती फक्त फिश करी राईस!
गोव्यात भाजपाच्या सरकार स्थापनेच्या हालचाली; १४ मार्चला शपथविधी?
गोव्यातील भाजपाच्या यशाचे श्रेय जनतेचे
या पाच वर्षात भाजपाने उत्तराखंड राज्यात ३ मुख्यमंत्री दिले. त्रिवेंद्र सिंह रावत, तिरथ सिंह रावत आणि पुष्कर सिंह धामी असे तीन नेते उत्तराखंडचे मुख्यमंत्री झाले होते. यापैकी पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वात २०२२ ची निवडणूक लढली गेली. या निवडणुकीत भाजपाला पुन्हा एकदा जनतेने कौल दिला आहे. पण असे असले तरी देखील या विजयला एक कडवट किनार लाभली आहे.
भाजपाचे मुख्यमंत्री पुष्कर सिंहा धामी यांचा निवडणुकीत परभाव झाला आहे. खातिमा या त्यांच्या मतदारसंघातून ते पराभूत झाले आहेत. काँग्रेसचे उमेदवार भुवन कापरी यांनी त्यांचा पराभव केला आहे. त्यामुळे आता उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री कोण असणार हे बघणे महत्वाचे असणार आहे.